मालमत्ता कर थकल्याने तीन दिवसांत ३९ भूखंड जप्त; नांदेड महापालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:16 PM2018-01-24T18:16:26+5:302018-01-24T18:16:56+5:30
महानगरपालिकेकडून नोटिसा देवूनही मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे क्षेत्रीय कार्यालय १ अंतर्गत येणार्या ३९ भूखंडावर जप्तीची मनपाने कारवाई केली आहे़ २१ , २२ आणि २३ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईमुळे मालमत्ता न भरणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे़
नांदेड : महानगरपालिकेकडून नोटिसा देवूनही मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे क्षेत्रीय कार्यालय १ अंतर्गत येणार्या ३९ भूखंडावर जप्तीची मनपाने कारवाई केली आहे़ २१ , २२ आणि २३ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईमुळे मालमत्ता न भरणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे़
क्षेत्रीय कार्यालय क्रमांक १ तरोडा, सांगवी अंतर्गत येणार्या मालमत्ता कर भरण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या़ मात्र, या नोटिसानंतरही कर न भरल्यामुळे तरोडा खु़ भागातील गट क्रमांक ५० पैकी प्लॉट क्रमांक १ ते २० चा थकबाकीसह २ कोटी १९ लाख ३५ हजार ३३९ रूपयांचा कर भरला नसल्याने त्यांच्या मालकीचे २० मोकळे भूखंड जप्त करण्यात आले़ तर तरोडा येथील गट ४०, ४१, ५० व ५५ पैकी मालमत्ता क्रमांक १२-८-४९६ चा थकबाकीसह १ कोटी ३० लाख ४६ हजार ८ रूपयांचा कर भरला नसल्याने त्यांचा १ भूखंड जप्त करण्यात आला़
दरम्यान, २२ जानेवारी रोजी गट क्ऱ ११, १२, १३, १४, १५ व १७ मधील प्लॉट क्र १, ४५, ४६, ४७, ४८, ३८, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ३६, ३४, ३५, ३०, ३१ व ३२ अशा एकूण १७ प्लॉटचा कर थकबाकीसह २ लाख २६ हजार ९४२ न भरल्यामुळे १७ मोकळे भूखंड जप्त केले़ २३ जानेवारी रोजी सांगवी बु़ येथील गट क्रमांक ११७ मधील प्लॉट क्रमांक ८३ हा जप्त करण्यात आला़ ज्याची मालमत्ता कराची थकबाकी ३६ हजार ९८६ रूपये होती़ तसेच ३५ हजार ६०९ रूपये थकबाकी असणार्या मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे़ दरम्यान, एका मालमत्ताधारकांने ६१ हजार ३०७ रूपयांचा थकीत मालमत्ता कराचा धनादेश देऊन कारवाई टाळली.