बचत खात्यातून परस्पर ४ लाख ३५ हजार उचलले; हिमायतनगर येथे डाक अधिकाऱ्यासह कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 08:33 PM2019-01-03T20:33:15+5:302019-01-03T20:34:16+5:30

बचत अकाउंटमधून परस्पर लाखो रुपयाची रक्कम उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

4 lakh 35 thousands fraud from the savings account; Employees suspended with postal authorities at Himayatnagar | बचत खात्यातून परस्पर ४ लाख ३५ हजार उचलले; हिमायतनगर येथे डाक अधिकाऱ्यासह कर्मचारी निलंबित

बचत खात्यातून परस्पर ४ लाख ३५ हजार उचलले; हिमायतनगर येथे डाक अधिकाऱ्यासह कर्मचारी निलंबित

Next

हिमायतनगर (नांदेड) : येथील उपडाक विभागाच्या कार्यालयात खातेदाराच्या बचत अकाउंटमधून परस्पर लाखो रुपयाची रक्कम उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तत्कालीन डाक अधिकारी व एक कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. 

हिमायतनगर येथे भारतीय डाक विभागाचे उपडाक कार्यालय आहे़ तत्कालीन पोस्ट मास्टर शे. महेबूब व त्यांचा सहाय्यक चव्हाण यांच्या माध्यमातून रक्कमेची उचला-भरणा करण्याचे काम चालत होते. या दोघांनाही संगनमत करून येथील ग्राहक विठ्ठल बाबा कोमावार यांच्या बचत खात्यातून ४ लक्ष ३१ हजार ३३ रुपयांपैकी ४ लक्ष ३० हजार ९५३ रुपयाची रक्कम परस्पर उचलली. त्यामुळे १ एप्रिल रोजी त्यांच्या खात्यााकेवळ ८४ रुपये शिल्लक राहिले़ ही बाब स्टेटमेंट काढल्यानंतर लक्षात आली. त्यामुळे आपल्या सहीशिवाय परस्पर रक्कम उचलल्याची तक्रार खातेदाराचे नातू साईनाथ कोमावार यांनी नांदेड डाक विभागाच्या वरिष्ठांकडे केली होती. 

त्यानुसार वरिष्ठ डाक अधिकारी लिंगायत आणि भोकर येथील चौकशी अधिकारी पदमे तसेच अन्य तिघांनी हिमायतनगरच्या उपडाक कार्यालयास भेट देऊन चौकशी केली. यावेळी तत्कालीन डाक अधिकारी यांच्या कार्यकाळातील सर्व अभिलेखे जप्त करण्यात आले. दरम्यान, आणखी काही ग्राहकांच्या खात्यातून अशाच पद्धतीने रक्कम उचलल्याचा संशय असून परस्पर उचललेली काही रक्कम संबंधितांनी जमा केल्याचेही सांगितले जात जात आहे़  

पडताळणी करण्यात येत आहे 
या प्रकरणाची चौकशी सुरुकरण्यात आली असून आणखी आठ-दहा दिवसात नेमका किती रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, ते स्पष्ट होईल़  प्रत्येक खातेदाराला विचारपूस करून रक्कमेची पडताळणी करण्यात येत आहे़ ग्राहकांनी कसलाही गैरसमज करून घेऊ नये, दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल
-एस.बी.लिंगायत,  सुपरिंटेंडेंट आॅफिसर

सखोल चौकशी करावी 
शासन व जनतेची फसवणूक करून रक्कमेची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकारानी सबंधित दोषींवर कलम ४२० नुसार कारवाई करण्याची आवश्यकता आहे़ डाक विभागाने सदर प्रकरण गांभीर्याने घेवून वरील कर्मचाऱ्यांनी आणखी काय गैरव्यवहार केला आहे का याचीही सखोल चौकशी करायला हवी
- साईनाथ कोमावार, रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य

Web Title: 4 lakh 35 thousands fraud from the savings account; Employees suspended with postal authorities at Himayatnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.