४ तास चार्जिंगवर सायकलचा ४० किमीचा प्रवास; पानटपरी चालकाच्या वैज्ञानिक आविष्काराचे होतेय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 01:12 PM2021-06-29T13:12:33+5:302021-06-29T15:23:24+5:30

दिवसेंदिवस होत असलेले प्रदूषण व वाढत्या पेट्रोलच्या किमतीवर पर्याय काढत, अर्धापूर शहरात पानठेला चालविणाऱ्या शिवहार घोडेकर या तरुणाने विजेवर चालणारी अनोखी सायकल बनविली आहे.

40 km bicycle ride on 4 hours charging; The scientific invention of the Pantpari driver is appreciated | ४ तास चार्जिंगवर सायकलचा ४० किमीचा प्रवास; पानटपरी चालकाच्या वैज्ञानिक आविष्काराचे होतेय कौतुक

४ तास चार्जिंगवर सायकलचा ४० किमीचा प्रवास; पानटपरी चालकाच्या वैज्ञानिक आविष्काराचे होतेय कौतुक

googlenewsNext
ठळक मुद्देपानठेला चालविणाऱ्या सुशिक्षित तरुणाने केला वैज्ञानिक कलेचा आविष्कारपेट्रोल-डिझेल महागाईत बनविली इलेक्ट्रिक चार्जवरील प्रदूषणमुक्त सायकल

- गोविंद टेकाळे

अर्धापूर ( नांदेड ) : अर्धापूर शहरांमध्ये पानठेला चालवत, पान सुपारी, पान विक्री करत शिक्षण पूर्ण केले. रेल्वे, महावितरण या ठिकाणी कंत्राटी पदावर नोकरी केली. गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे बेरोजगार असलेल्या तरुणाने दुकानावर व शेतीकडे ये-जा करण्यासाठी पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त सायकल तयार केली असून, त्याच्या या कलेची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

दिवसेंदिवस होत असलेले प्रदूषण व वाढत्या पेट्रोलच्या किमतीवर पर्याय काढत, अर्धापूर शहरात पानठेला चालविणाऱ्या शिवहार घोडेकर या तरुणाने विजेवर चालणारी अनोखी सायकल बनविली आहे. फक्त १४ हजार रुपयांमध्ये ४ तास चार्जिंगवर ३५ ते ४० किमीचे अंतर पार करता येते. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत, त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. त्यावर पर्यायी मार्ग काढत, अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौक परिसरामध्ये राहात असलेल्या शिवहार प्रकाश घोडेकर या ३२ वर्षीय तरुणाने इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी प्रदूषणमुक्त अशी सायकल तयार केली आहे. फक्त पाच रुपये खर्चामध्ये चार तास चार्ज केल्याने तब्बल चाळीस किलोमीटरचे अंतर सायकलने पार करता येते.

अर्धापूर शहरांमध्ये पान ठेल्याचे दुकान चालवत शिक्षण पूर्ण केले, आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत, वायरमनचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर, त्यांनी रेल्वे डिव्हिजनमध्ये तीन वर्षे व महावितरणमध्ये तीन वर्षे कंत्राटी पदावर काम केले. गेल्या दोन वर्षांपासून कोणतेही काम नसल्याने ते पानठेला चालवायचे. लॉकडाऊनमुळे सर्व अस्थापना बंद असल्याने, त्यांनी चार्जिंगवरील सायकल बनवण्याचा प्रयोग करण्याचा संकल्प केला व विजेवर चालणारी सायकल तयार करत आपले स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्यांच्या या वैज्ञानिक कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



 

बघण्यासाठी नागरिकांची गर्दी
पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने अनेकांनी बघितली आहेत. मात्र, चार्जिंगवर बनविलेली सायकल पहिल्यांदाच बघण्यात येत असल्याने, नागरिकांना कुतूहल वाटत असून, ही सायकल बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

५ रुपयांत ४० किमी पार
१४ हजार रुपये खर्च आला असून, मोटार २४ होल्ट ३५० वॅट, बॅटरी २४ होल्ट ३५० वॅट, चार्जिंग किट, लाइट, गीअर एक्सलेटर, इलेक्ट्रिक ब्रेक आदींसह वेल्डिंगचा वापर करत, ही सायकल बनविण्यात आली आहे. पाच रुपये चार्जिंगवर ४० किमी अंतर पार करता येते.

चार्जिंग फ्रीमध्ये होण्याची व्यवस्था करणार
चार्जिंगवरील सायकल बनवली असून, पुढील काळात सायकल चालविताच चार्जिंग व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहे.
- शिवहार घोडेकर, अर्धापूर

Web Title: 40 km bicycle ride on 4 hours charging; The scientific invention of the Pantpari driver is appreciated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.