४० बाधित ३४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:43 AM2020-12-17T04:43:25+5:302020-12-17T04:43:25+5:30
बुधवारी प्रशासनाला १ हजार २२६ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र १४, मुदखेड १, मुखेड ...
बुधवारी प्रशासनाला १ हजार २२६ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र १४, मुदखेड १, मुखेड ६, हिमायतनगर १, धर्माबाद १, नांदेड ग्रामीण १, देगलूर ४, लोहा १, नायगांव १ आणि परभणी येथील १ जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अँटीजेन तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र ७ आणि लोहा येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. सध्या २८३ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ३१, जिल्हा रुग्णालय २७, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत २०, मुखेड ८, देगलूर १०, हदगांव ६, किनवट ३, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १२४, ग्रामीण भागातील गृहविलगीकरण२६, हैद्राबाद येथे संदर्भित १, औरंगाबाद येथे संदर्भित १ आणि खाजगी रुग्णालयात २६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे १६१ आणि जिल्हा रुग्णालयात ६८ खाटा रिक्त आहेत. बुधवारी ३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १, एनआरआय व गृह विलगीकरण १६, लोहा ३, जिल्हा रुग्णालय ३, किनवट ३ आणि खाजगी रुग्णालयातील आठ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १९ हजार ८७२ जणांनी कोराेनावर मात केली आहे.