व्यापाराच्या घरावर दरोडा, मारहाण करत 40 तोळे सोन्यासह 22 लाखाची रोकड केली गायब
By श्रीनिवास भोसले | Updated: June 15, 2024 14:22 IST2024-06-15T14:22:30+5:302024-06-15T14:22:30+5:30
कंधार तालुक्यातील कौठा येथे कृषी सेवा केंद्र चालक सहकुटुंब घरी झोपले असता १५ रोजी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास गँस कटरने गेट तोडत सहा दरोडेखोर तोंडाला रुमाल बांधून घरात घुसले. सुरुवातीला दोघा पती पत्नीचे मोबाईल फोडत व्यापार्यास धमकावले अन् चाकू, राँडने मारहण केली.

व्यापाराच्या घरावर दरोडा, मारहाण करत 40 तोळे सोन्यासह 22 लाखाची रोकड केली गायब
कौठा ता कंधार (जि.नांदेड) - मागील काही दिवसा पासुन कौठा परिसरात चोरट्यांनी जनावरे पाण्याच्या मोटारी पळवल्याच्या घटना ताज्या असतानाच दि १५ जुन रोजी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या व्यापार्याचे घर फोडून ४० तोळे सोनं आणि २२ लाखांची रोकड दरडोखरांनी लांबविल्याची माहिती आहे. ही घटना कंधार पोलीस ठाण्यापासून पासून ३० कि मी अंतरावर असलेल्या कौठा येथे घडली आहे.
कंधार तालुक्यातील कौठा येथे कृषी सेवा केंद्र चालक सहकुटुंब घरी झोपले असता १५ रोजी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास गँस कटरने गेट तोडत सहा दरोडेखोर तोंडाला रुमाल बांधून घरात घुसले. सुरुवातीला दोघा पती पत्नीचे मोबाईल फोडत व्यापार्यास धमकावले अन् चाकू, राँडने मारहण केली.
दरोडेखोरांनी सदरील कुटुंबावर प्रचंड दहशत निर्माण करत व्यापार्याच्या उजव्या डोळ्यावर चाकूने तर पायावर राँडने वार करून जखमी करत घरातील सर्व रोख आणि दागिने काढण्यास सांगितले. मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने कुटुंब भयभीत झाले होते आहे, हवे ते घेऊन जा पण मारु नका अशी विनवणी केली. जवळपास 40 तोळे सोने आणि 22 लाखाची रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे. त्याचबरोबर फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्कोडही पाचारण करण्यात आले आहे.
दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद
पोलिस कारवाई करण्याची सुध्दा हिमंत कुटुंब दाखवत नव्हते सदरील कुटुंब प्रचंड दहशती खाली असल्याचे दिसत होते दरोडेखोर हे पांढर्या रंगाच्या बेलोरो गाडीत सहा जण गेल्याचे सिसी टिव्ही कॅमेरात कैद झाले. आहेत १९७२ नंतर गावात सर्वात मोठा दरोडा असल्याचे वयस्कर लोक सांगत आहेत घटना घडल्या सात तासाला कंधार पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव घटना स्थळावर आले. दरोडेखोराच्या हल्यामुळे व्यापार्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.