नांदेड विभागातील विकास कामांसाठी ४ हजार कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:05+5:302021-07-18T04:14:05+5:30

नांदेड येथील वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ कार्यालय व इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी विधान परिषद प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, ...

4,000 crore for development works in Nanded division | नांदेड विभागातील विकास कामांसाठी ४ हजार कोटींचा निधी

नांदेड विभागातील विकास कामांसाठी ४ हजार कोटींचा निधी

googlenewsNext

नांदेड येथील वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ कार्यालय व इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी विधान परिषद प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिरडे, अधीक्षक अभियंता अविनश धोंडगे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ संजय गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड विभागातील मंजूर केलेल्या विविध विकास कामांबाबत प्रशासकीय सेवा-सुविधा व इतर अत्यावश्यक कार्यालये इथेच असणे आवश्यक होते. प्रशासकीय कामांसाठी औरंगाबाद, उस्मानाबाद येथे सातत्याने जावे लागायचे. यासाठी वेळेचा अपव्यय होणे व परिणामी जी कामे हाती घेतली आहेत, त्या कामांच्या पूर्ततेला विलंब लागणे असे चक्र सुरू होते. नागरिकांच्या सेवा-सुविधांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, या दृष्टीने विचार करून नांदेड येथे प्रशासकीय सोयीसाठी वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ पद स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला. आज हे कार्यालय स्वतंत्र इमारतीत सुरू होत असल्याबद्दल मला आनंद होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या कार्यालयात आता एक वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, एक वास्तुशास्त्रज्ञ, एक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, एक सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ ही चार पदे निर्माण करून त्याला मान्यता दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील पूल व इमारती यांच्या संकल्पनसाठी स्वतंत्र विभाग आहे. हे कार्यालय सद्यस्थितीत मुंबईमध्ये आहे. यासंदर्भातील पूल व इमारत यांच्या संकल्पनबाबतची हायब्रीड ॲन्युईटी, एडिबी इतर अनुषंगिक कामे नांदेड येथेच मार्गी लागावीत यादृष्टीनेही नांदेड येथे संकल्पचित्र विभाग पूल आणि इमारती हे कार्यालय सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाच्या दृष्टीने सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्याचे ते म्हणाले.

मोठ्या कष्टाने आपण इमारती निर्माण करतो. त्या इमारतीतील स्वच्छता आणि निगा तेवढीच महत्त्वाची आहे. चांगल्या कामासाठी कंत्राटदारही चांगले असले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नांदेड विभागात शासकीय क्वार्टरसह अनेक इमारती या जुन्या झालेल्या आहेत, मोडकळीस आलेल्या आहेत. काही इमारती या १९६८ पासून आहेत. त्यांच्या मेंटेेनन्सवर होणाऱ्या खर्चामध्ये संपूर्ण सार्वजनिक विभागाचे एकत्र संकुल होऊ शकेल. याबाबत आढावा घेऊन नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी गतवर्षभरात युध्दपातळीवर पूर्णत्वास नेलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ अजय मोरे, अधीक्षक अभियंता विद्युत अ. बा. चौघुले, कार्यकारी अभियंता ( नॅशनल हायवे) संजय साहुत्रे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे आदी उपस्थित होते.

Web Title: 4,000 crore for development works in Nanded division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.