‘मानार’ मध्ये ४१ टक्केच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:57 AM2018-10-07T00:57:40+5:302018-10-07T00:58:07+5:30

मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा असून यंदा परतीच्या पावसावर प्रकल्प भरेल, अशी आशा बळीराजा करु लागला आहे. मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा राहिला असल्याने नायगाव, बिलोली, धर्माबाद या ठिकाणचा पिण्याचा व सिंचना प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दुसºया वर्षीही प्रकल्प भरला नाही.

41 percent storage in 'Manar' | ‘मानार’ मध्ये ४१ टक्केच साठा

‘मानार’ मध्ये ४१ टक्केच साठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बारुळ: मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा असून यंदा परतीच्या पावसावर प्रकल्प भरेल, अशी आशा बळीराजा करु लागला आहे.
मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा राहिला असल्याने नायगाव, बिलोली, धर्माबाद या ठिकाणचा पिण्याचा व सिंचना प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दुसºया वर्षीही प्रकल्प भरला नाही.
मानार प्रकल्पाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या हस्ते १५ जानेवारी रोजी १९६४ रोजी करण्यात आले. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी केंद्रीय गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.या प्रकल्पासाठी सात गावे स्थलांतरीत करण्यात आली. २ हजार ८६० हेक्टर जमीन कंधार तालुक्यातील गेली. १४६.९२ दलघमी जलसाठा असलेला हा प्रकल्प कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद तालुक्यांतील नागरिक व शेतकºयांसाठी वरदान ठरला आहे. या प्रकल्पावर २५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. बारुळ, बाचोटी, बहाद्दरपूरा, तेलूर,वरवट, धर्मापुरी, चिंचोली येथील सुमारे १५० भोई समाजाचा मच्छ व्यवसाय चालतो.
बारुळ मानार प्रकल्प इ. स. २०१६-१७ मध्ये तुडुंब भरला होता. सलग दोन वर्षापासून मात्र प्रकल्प पन्नास टक्क्याच्यावर पाणीसाठा गेला नाही. मागील वर्षी २०१७-१८ मध्ये प्रकल्पात या महिन्यात ३० साठा होता. यंदा २०१८-१९ आॅक्टोबरमध्ये आजरोजी प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे मच्छ व्यवसाय, सिंचनावर संकट येणार की काय, अशी भीती वाटू लागली आहे. बारुळ परिसरात सुरुवातीला चांगला पाऊस झाला.
सोयाबीन उत्पादनात घट
बारुळ मंडळातील ३८ गावांत शेतक-यांनी सोयाबीन पीक घेतले होते. प्रारंभी पिकाला चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. या काळात पिकावर ‘करपा’ रोग पडला. त्यामुळे उत्पन्नावर घट झाली. पावसाच्या हुलकावणीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

Web Title: 41 percent storage in 'Manar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.