नांदेड जिल्ह्यात मुद्रा योजनेद्वारे ४४९ कोटींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:57 PM2018-02-27T23:57:26+5:302018-02-27T23:57:31+5:30
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत चालू वर्षात नांदेड जिल्ह्यात ४४९ कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत चालू वर्षात नांदेड जिल्ह्यात ४४९ कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात ३१ डिसेंबर २०१७ अखेर ११ हजार ९१४ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. कर्ज वाटपात महाराष्टÑ देशात तिसºया क्रमांकावर असल्याचे सांगत एकट्या नांदेड जिल्ह्यात सुमारे साडेचारशे कोटी रूपयांच्या कर्जाचे वाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले.
शिशू गटामध्ये एक लाख ३२ हजार ११६ प्रकरणांत ३१७ कोटी ६५ लाख रूपये, किशोर गटाच्या तीन हजार ३०४ प्रकरणांमध्ये ७९ कोटी २० लाख रूपये आणि तरूण गटात ७०९ प्रकरणांत ५२ कोटी १६ लाख रूपयांचे कर्ज जिल्ह्यातील गरजू बेरोजगारांना वाटप करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण प्रकरणांची संख्या एक लाख ३६ हजार १२९ एवढी असून याद्वारे ४४९ कोटी १ लाख रूपये विविध बँकांद्वारे उद्योगासाठी दिल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले.
कर्जवाटपामध्ये एसबीआय अॅण्ड असोसिएट बँकेने १ हजार २४५ प्रकरणे केली असून त्यांनी ३६ कोटी पाच लाख रूपये, पब्लिक सेक्टर बँकेने दोन हजार ११६ प्रकरणांद्वारे ६२ कोटी ७२ लाख तर प्रायव्हेट सेक्टर बँकेने ७४ हजार ३० प्रकरणांत १९८ कोटी एक लाख रूपयांचे कर्ज वितरीत केले आहे. तसेच रिजनल रूरल बँकेने एक हजार २७९ प्रकरणे करून २६ कोटी ९५ लाख, एनबीएफसी-मायक्रो फायनान्स इन्स्टिटयूटने ५७ हजार ४५९ प्रकरणात १२५ कोटी २९ लाख अशी एकूण १ लाख ३६ हजार १२९ प्रकरणांत ४४९ कोटी एक लाख इतक्या रक्कमेचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी एस. ए. थोरात, मानव विकास यंत्रणेचे नियोजन अधिकारी डी.बी. सुपेकर, उद्योजक सतीश सामंते, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक विजय उशीर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
योजनेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन
बैठकीत मुद्रा योजनेशी संबंधित विषयावर चर्चा झाल्यानंतर योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. गरजू आणि बेरोजगार तरूणांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शहराबरोबरच ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम तसेच आदिवासी भागात जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी संबंधित यंत्रणेला केले आहे.