चार प्रकल्पांत ४६ टक्के साठा
By admin | Published: November 6, 2014 01:40 PM2014-11-06T13:40:23+5:302014-11-06T13:40:23+5:30
जिल्ह्यातील चार मोठय़ा प्रकल्पांमध्ये आजघडीला ५१.६५ तर मध्यम प्रकल्पात ४१.८ टक्के पाणी शिल्लक आहे.
Next
>नांदेड : जिल्ह्यातील चार मोठय़ा प्रकल्पांमध्ये आजघडीला ५१.६५ तर मध्यम प्रकल्पात ४१.८ टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक ७४ टक्के पाणी विष्णूपुरीत असले तरी, पुढील तीन महिन्यानंतर शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तर शेतकर्यांची रबीही संकटात सापडली आहे.
विष्णूपुरी बंधार्यामुळे शहरवासियांचा पाणीप्रश्न सुटला होता. या धरणाची क्षमता जवळपास ८0 दलघमी आहे. यंदा हे धरण १00 टक्के भरले होते. परंतु आजघडीला त्यात फक्त ५९.९ दलघमी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मनपाला येत्या तीन महिन्यानंतर पाणीटंचाईचे नियोजन करावे लागणार आहे. परंतु त्यापूर्वी फेब्रुवारीमध्येच शहरवासियांना पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याची दाट शक्यता आहे.
जिल्ह्यातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये ५१.७५ टक्के जलसाठा आहे. त्यात इसापूर प्रकल्पात ७२ टक्के पाण्याचा जिवंत साठा आहे. तर लोअर मनार प्रकल्पात-२४ टक्के, अप्पर मनार प्रकल्पात-३७ टक्के पाणी शिल्लक आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ४१.८ टक्के पाणी आहे. त्यात आमदुरा प्रकल्पात सर्वाधिक २३.७0 दलघमी एवढे पाणी आहे. दिग्रस प्रकल्पात-१८.७८ दलघमी, कारडखेड-५.२३ दलघमी, कुंदराळा- ३.३0१ दलघमी पाणी आहे. तर बाभळी बंधार्यात मात्र शून्य टक्के पाणीसाठा आहे.
त्यामुळे जिल्हावासियांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात शेतकर्यांकडून रबी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. परंतु पिण्यासाठीच सध्या प्रशासनाकडून पाणी आरक्षित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांची रबीही संकटात सापडली आहे.
त्यात नुकतेच दुष्काळामुळे हातातोंडाशी आलेला घास गेलेल्या शेतकर्यांना रबीपासून असलेल्या थोड्याफार अपेक्षांचा भंग होण्याची चिन्हे आहेत. /(प्रतिनिधी)