४९ शाळांची घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:49 AM2020-12-04T04:49:03+5:302020-12-04T04:49:03+5:30
तालुक्यात जिल्हा परिषद व संस्थेच्या मिळून हायस्कूल ३७ व ज्युनिअर काॅलेज १२ आहेत. कोविडमुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंदच ...
तालुक्यात जिल्हा परिषद व संस्थेच्या मिळून हायस्कूल ३७ व ज्युनिअर काॅलेज १२ आहेत. कोविडमुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंदच होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू होते. जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २ डिसेंबर रोजी या शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांत मास्क, साबण, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना सर्व माहिती दिली. गटशिक्षणाधिकारी लता काैठेकर, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख अशोक परळे, एम.जे. कदम, हनवटे आदींनी शाळांना भेटी देऊन पाहणी केली.
किनवट तालुक्यातील ८० शाळा सुरू
किनवट : नववी ते बारावीच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तब्बल आठ महिन्यांनंतर उघडण्यास परवानगी मिळाल्याने किनवट तालुक्यातील ८० शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांनी शाळांना भेटी देऊन कोविड-१९ ची चाचणी केली की नाही याची माहिती जाणून घेतली.
तब्बल आठ महिन्यांनी शाळा उघडायला परवानगी मिळाल्यानंतर बुधवारी ८० शाळा, महाविद्यालये सुरू झाली. पहिल्याच दिवशी गावोगावी भेटी देऊन गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांनी भेटी दिल्या. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर व अँटिजन टेस्ट केल्या की नाही, किती जणांनी केल्या, सर्वांनी कोविड-१९ ची चाचणी केली की नाही, याची माहिती जाणून घेतली. शिवाय पालकांची सहमती घेतली की नाही, ही बाब जाणून घेण्यात आली. नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी सांगितले.