मृत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होताहेत ५ कोटी रुपये; धक्कादायक माहिती समोर
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: October 6, 2023 05:53 IST2023-10-06T05:52:11+5:302023-10-06T05:53:09+5:30
जिल्ह्यात ५१ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने पीएम किसान योजनेतील हा गोंधळ पुढे आला आहे.

मृत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होताहेत ५ कोटी रुपये; धक्कादायक माहिती समोर
रामेश्वर काकडे
नांदेड : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेमध्ये जिल्ह्यातील तब्बल ८,९०० मयत शेतकऱ्यांच्या नावावर अनुदानाची रक्कम जमा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात ५१ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने पीएम किसान योजनेतील हा गोंधळ पुढे आला आहे. मयत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ५ कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा होत आहे.
ई-केवायसी आणि आधार सीडिंग नसणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसानच्या सहा हजार रुपयांच्या यादीतून वगळले जाणार आहे.
मयत लाभार्थ्यांचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन पीएम किसान योजनेच्या यादीतून वगळण्यासाठी पोर्टलवर अपलोड करून अपात्र लाभार्थी वगळण्याचे काम सुरू आहे. ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल त्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावी, जेणेकरून पंधरावा हप्ता लवकरात लवकर मिळेल.
- विजय बेतीवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी, नांदेड