लाल वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या मांजरा पात्रातून मिळणार ५ कोटीचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 03:33 PM2017-12-21T15:33:04+5:302017-12-21T15:36:44+5:30

सीमावर्ती मांजरा नदी पात्रातून पहिल्या फेरीत लिलाव झालेल्या सहा वाळू घाटांतून सव्वाचार लाख कोटी तर कोळगाव या काळी वाळू उपशापोटी ५० लाख असा एकूण ५ कोटींचा महसूल बिलोली तालुक्यातून मिळणार आहे़

5 crores of revenues from the manjara basin, which is known for its red sand | लाल वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या मांजरा पात्रातून मिळणार ५ कोटीचा महसूल

लाल वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या मांजरा पात्रातून मिळणार ५ कोटीचा महसूल

googlenewsNext

बिलोली (नांदेड) : सीमावर्ती मांजरा नदी पात्रातून पहिल्या फेरीत लिलाव झालेल्या सहा वाळू घाटांतून सव्वाचार लाख कोटी तर कोळगाव या काळी वाळू उपशापोटी ५० लाख असा एकूण ५ कोटींचा महसूल बिलोली तालुक्यातून मिळणार आहे. दरम्यान, नूतन वर्ष २०१८ च्या प्रारंभी वाळू उपशाला प्रारंभ होईल़ सध्या आॅक्टोबरपासून संपूर्ण वाळू उपसा बंद आहे़ पण पहाटेच्या वेळी चोरी-छुपे वाळूची वाहतूक होत आहे.

संपूर्ण मराठवाड्यात गौण-खनिजच्या माध्यमातून बिलोली तालुका महसूल मिळवण्यात अव्वल आहे़ मांजरा नदी लाल वाळूसाठी तर गोदावरी नदी काळ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे़ मांजराच्या पात्रात जवळपास दहा-बारा गावालगत वाळूचे घाट आहेत़ यावर्षी प्रथमच प्रत्येक घाटांचे विभाजन करून दोन घाटांचे ई-लिलाव ठेवण्यात आले होते़ शासकीय १७ घाटांपैकी ई-निविदा व ई-लिलावान्वये पहिल्या फेरीत मांजरा पात्रातील सहा वाळू घाट ई-लिलावातून स्पर्धेत सुटले आहेत़ उर्वरित दहा घाटांना अद्याप ठेकेदारांनी निविदा भरली नव्हती.

गंजगाव २ घाट, कार्ला बु़ २ घाट, बोळेगाव २ घाट, माचनूर २ घाट, सगरोळी २, येसगी २, हुनगुंदा, चिरली, कोळगाव असे प्रत्येकी एक घाटान्वये ई-निविदा मागवण्यात आली़ ज्यामध्ये गोदावरीच्या कोळगावसाठी ४८ लाख, मांजराच्या कार्ला बु़ ५२ लाख ३२ हजार, कार्ला बु-५६ लाख, बोळेगाव १ कोटी ३१ लाख, माचनूर ५८ लाख ५३ हजार, सगरोळी ६९ लाख ७७ हजार, सगरोळी २ रा घाट ६९ लाख ९९ हजार असा सव्वाचार कोटी तर कोळगाव मिळून ५ कोटी महसूल सात घाटाच्या लिलावातून मिळणार आहे़ मांजराच्या लाल स्फटीक वाळूला तेलंगणा, कर्नाटक व मराठवाड्यात मागणी आहे़ सध्या शासकीय व खाजगी बांधकाम वाढलेले असल्याने वाळूची प्रचंड मागणी आहे.

Web Title: 5 crores of revenues from the manjara basin, which is known for its red sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड