उर्दू घराच्या देखभालीसाठी ५० लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:18 AM2021-04-04T04:18:30+5:302021-04-04T04:18:30+5:30
नांदेड : राज्यातील एकमेव उर्दू घर असलेल्या नांदेडमधील उर्दू घराच्या देखभालीसाठी राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने ५० लाखांचा निधी मंजूर ...
नांदेड : राज्यातील एकमेव उर्दू घर असलेल्या नांदेडमधील उर्दू घराच्या देखभालीसाठी राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. उर्दू घराचा वापर, देखभाल, दुरुस्ती यासाठी नियमावली निश्चित करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार उर्दू घरांचे नियंत्रण व व्यवस्थापन जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी यांच्यामार्फतच करण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी उर्दू घराच्या दुरुस्तीसाठी अनुदानाची मागणी राज्य सरकारकडे केली होती. वित्त व नियोजन विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार नांदेडमधील उर्दू घराच्या देखभाल, दुरुस्तीसाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये कंत्राटी कर्मचारी, कार्यालयीन खर्च, सौर संयंत्र बसवणे, प्रोजेक्टर, सिस्टीम व साऊंड सिस्टीम, सीसीटीव्ही, संगणक आदी बाबींसाठी ही रक्कम खर्च करता येणार आहे.