उमरीतील बालिका विद्यालयासाठी शासनाकडून ५० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:42 AM2018-02-26T00:42:19+5:302018-02-26T00:42:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरी : येथील सिंचन कॉलनीत मागील सात- आठ वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत भरणा-या कस्तुरबा गांधी विद्यालयासाठी दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरी : येथील सिंचन कॉलनीत मागील सात- आठ वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत भरणा-या कस्तुरबा गांधी विद्यालयासाठी दोन वर्षांपूर्वी भव्य इमारत बांधण्यात आली़ मात्र या इमारतीस संरक्षक भिंत, विद्युतीकरण व पाण्याची सोय नसल्याने ही शाळा स्थलांतरित झाली नव्हती़ दरम्यान, ही बाब जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी उर्वरित विकासकामे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून ५० लाख मंजूर करून घेतले़
मानव विकास कार्यक्रमांतर्गत स्पेसिफिक योजनेतंर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन बराच कालावधी होवून गेला आहे़ सदरील इमारत व मानव विकासच्या मुलींचे वसतिगृह हे गावाच्या बाहेर आहे़ मुलींच्या संरक्षणाच्या उपाययोजना तसेच विद्युतीकरण, पाणीपुरवठा व इतर आवश्यक सुविधा तेथे नसल्याने सदर इमारत रिकामी पडून होती़ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संरक्षक भिंत व मुख्य प्रवेशद्वाराजवळ संरक्षक कक्षाचे बांधकाम करून विद्युत व पाणी पुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास ही इमारत विद्यार्थिनींच्या शैक्षणिक व निवासी वापरासाठी उपयुक्त ठरणार असल्याची बाब जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मानव विकास आयुक्तालयाचे आयुक्त यांच्याकडे ५० लाखांचा प्रस्ताव सादर केला होता़
स्पेसिफिक योजनेतून विकास कामासाठी ५० लाख निधीच्या प्रस्तावास मान्यता दिल्यास प्रस्तावित कामे पूर्ण करून येणाºया शैक्षणिक वर्षापासून नवीन इमारतीत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल, अशी माहितीही जिल्हाधिकाºयांनी आयुक्तांना कळविली होती़
त्यानुसार १४ फेब्रुवारी रोजी सदरील प्रस्तावास मंजुरी देण्यात आली़ विद्यालयाच्या विद्युतीकरणासाठी १४ लाख १० हजार पाणी पुरवठा सुविधेसाठी ४ लाख १० हजार व संरक्षण भिंत बांधकामासाठी ३१ लाख ८० हजार रूपये मंजूर करण्यात आले़ बालिका विद्यालय व नवीन निवासी शाळेसाठी १ कोटी १० लाख व वसतिगृहासाठी ४० लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहेत़ मात्र अत्यावश्यक सुविधा नसल्याने ही इमारत गत दोन वर्षापासून रिकामीच होती़ जिल्हाधिकाºयांच्या पुढाकारामुळे आता या ठिकाणी सोयी, सुविधा पूर्ण होऊन या भागातील विद्यार्थ्यांनींना पुढील शैक्षणिक वर्षापासून लाभ मिळणार आहे़ सध्या सुरू असलेल्या सिंचन नगरातील शाळा कमी जागेत व भाड्याच्या इमारतीत भरत असल्याने विद्यार्थींनींची गैरसोय होत आहे़ सुरूवातीला या विद्यालयात शिक्षण घेणाºया मुलींची संख्या २५ होती़ मात्र आता जवळपास २० संख्या झाली आहे़