पावसाळ्यातील ९० दिवसांपैकी ५१ दिवस कोरडेच; दुष्काळ वाढू लागला

By प्रसाद आर्वीकर | Published: September 6, 2023 06:26 PM2023-09-06T18:26:33+5:302023-09-06T18:26:59+5:30

पावसाचे दिवस कमी असल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

51 out of 90 days dry; Drought began to increase | पावसाळ्यातील ९० दिवसांपैकी ५१ दिवस कोरडेच; दुष्काळ वाढू लागला

पावसाळ्यातील ९० दिवसांपैकी ५१ दिवस कोरडेच; दुष्काळ वाढू लागला

googlenewsNext

नांदेड : यावर्षीच्या पावसाळ्यातील ९० दिवसांपैकी तब्बल ५१ दिवस कोरडे गेले आहेत. या दिवशी एकाही ठिकाणी पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

पावसाळ्याच्या १२० दिवसांमध्ये किमान ७० ते ८० दिवस पाऊस होणे अपेक्षित आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा शेतीसाठी डोकेदुखी ठरत आहे. यावर्षी मान्सून उशिराने दाखल झाला. कसा तरी पाऊस सुरु झाला. परंतु, पावसाचा खंड वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यातील ९० दिवसांमध्ये जिल्ह्यात केवळ ३९ दिवस पाऊस झाला असूर उरलेले ५१ दिवस कोरडे गेले आहेत. मागील वर्षी याच ९० दिवसांमध्ये ५१ दिवस पाऊस झाला होता. सध्या पावसाने ताण दिलेला असून, पिके ऊन धरु लागली आहेत. त्यामुळे दुष्काळ दररोज गंभीर होत चालला आहे.

जिल्ह्यात दरवर्षी पावसाळी हंगामात ८९१ मि.मी.पाऊस होतो. प्रत्येक पावसाळ्यात सरासरी ओलांडली जाते. मात्र पावसाचे दिवस कमी होतात. यावर्षी  आतापर्यंत ७३० मि.मी. पाऊस झाला आहे. मात्र पावसाचे दिवस कमी असल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात लोहा तालुक्यात सर्वात कमी पाऊस
लोहा तालुक्यात आतापर्यंत ५१८ मि.मी. पाऊस झाला आहे. इतर तालुक्यांशी तुलना करता या तालुक्यात सर्वात कमी पाऊस आहे. केवळ २७ दिवस तालुक्यात पाऊस झाला. त्या खालोखाल नांदेड तालुक्यात २८ दिवस पाऊस झाला आहे. २६ दिवस कोरडे राहिले आहेत.अ

Web Title: 51 out of 90 days dry; Drought began to increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.