नांदेड जिल्हा परिषदेतील ५३ कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:50 AM2018-04-03T00:50:32+5:302018-04-03T00:50:32+5:30
अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या गट ‘ड’ मधील कार्यरत ५३ कर्मचा-यांना गट ‘क’ पदावर फेरनियुक्ती देण्यात आली आहे़ संवर्ग- ३ मध्ये आलेल्या या सर्व कर्मचा-यांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली़ सदर कर्मचारी ३ एप्रिल रोजी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या गट ‘ड’ मधील कार्यरत ५३ कर्मचा-यांना गट ‘क’ पदावर फेरनियुक्ती देण्यात आली आहे़ संवर्ग- ३ मध्ये आलेल्या या सर्व कर्मचा-यांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली़ सदर कर्मचारी ३ एप्रिल रोजी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत़
शासकीय सेवेत अनुकंपा ही सवलत असून या सवलतीद्वारे दिवंगत कर्मचा-यांच्या पाल्यांना सेवेत नियमानुसार घेण्यात येते़ त्यानंतर अनुकंपा तत्त्वावरील कर्मचा-यांना १९९६ च्या शासन निर्णयानुसार सदर कर्मचा-याची शैक्षणिक पात्रता लक्षात घेवून त्यांना जिल्हा परिषदेमधील रिक्त पदावर फेरनियुक्ती देण्यात येते़ सोमवारी याच पद्धतीने ५३ कर्मचा-यांना गट क मध्ये फेरनियुक्ती देण्यात आली असून यात १८ कंत्राटी ग्रामसेवक, १४ आरोग्य सहाय्यक, १२ कनिष्ठ सहाय्यक (लेखा), ३ वरिष्ठ सहाय्यक (लेखा), २ विस्तार अधिकारी (पंचायत), १ विस्तार अधिकारी (सांख्यिकी), २ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि १ पशूधन पर्यवेक्षक अशा ५३ जणांचा समावेश आहे़
१९९६ व २०१० च्या निर्देशानुसार वर्ग ४ परिचरांच्या आदेशात कालांतराने वर्ग ३ चे पद रिक्त झाल्यानंतर त्यांना गट ड प्रवर्गात फेरनियुक्ती देण्याची अट आहे़ या नियमानुसार एकूण २३ परिचरांच्या मूळ आदेशात वरीलप्रमाणे अट नमूद नव्हती़ याप्रकरणी जिल्हा परिषदेने शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते़ शासनाने या प्रकरणी आपल्या स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते़
त्यामुळे वर्ग-४ मधील २३ परिचर यांना गट क या संवर्गात फेरनियुक्ती देण्यात आली़ यानुसार अशा ३० परिचरासोबत एकूण २३ जणांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार क गट संवर्गात वर्ग केल्याचे आदेश देण्यात आले़ जिल्हा परिषदेच्या या कार्यवाहीचे कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड यांनी स्वागत केले आहे़ सदर कर्मचाºयांना फेरनियुक्ती मिळावी यासाठी काही दिवसांपासून पाठपुरावा सुरु होता. या मागणीची सकारात्मक दखल घेत कार्यवाही केल्याने अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांना न्याय मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचाºयांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे अनुकंपा कर्मचाºयांची मोठी मागणी मान्य झाल्याचे सांगत, नियोजित प्रशिक्षणामुळे नव्या कामाची स्वरुप समजेल असे सांगितले.
फेरनियुक्त कर्मचाºयांना देणार प्रशिक्षण
गट ‘ड’ मधील ५३ कर्मचाºयांना गट ‘क’ पदावर फेरनियुक्ती देण्यात आली आहे़ या कर्मचाºयांच्या कामात पारदर्शकता यावी त्याबरोबरच त्यांना त्यांच्या नव्या कामाचे स्वरुप समजावे यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले़ नियुक्ती दिलेल्या सर्व कर्मचाºयांनी ३ एप्रिल रोजी त्यांना नेमून दिलेल्या जागी रुजू व्हावे, असेही निर्देश दिले असल्याचे ते म्हणाले़