जिल्ह्यात ५३ रुग्ण आढळले, एका रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:13 AM2021-06-17T04:13:44+5:302021-06-17T04:13:44+5:30
बुधवारी ९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ८८ हजार १७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी बरे झाल्याने घरी ...
बुधवारी ९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ८८ हजार १७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी बरे झाल्याने घरी सोडलेल्या रुग्णांमध्ये विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमधून २, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील ६८, मुखेड १, किनवट ४, हदगाव २, बिलोली १, अर्धापूर २, कंधार १, हिमायतनगर ३ आणि खाजगी रुग्णालयातील ५ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या ३६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ४ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८, किनवट कोविड रुग्णालय ६, जिल्हा रुग्णालय २३, देगलूर ३, हदगाव १, मुखेड २ व खाजगी रुग्णालयात १० तसेच मनपाअंतर्गत गृह विलगीकरणात २५२ तर विविध तालुक्यांतर्गत ५७ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.९० टक्क्यावर पोहचले आहे.