‘सौभाग्य’ योजनेद्वारे नांदेड जिल्ह्यातील साडेपाच हजार कुटुंबांना मिळणार वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 06:19 PM2018-02-26T18:19:58+5:302018-02-26T18:20:27+5:30

‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात अद्यापपर्यंत वीज न पोहोचलेल्या ५ हजार ५२५ कुटुंबाना वीजजोडणी देवून त्यांचे जीवनमान प्रकाशमान करण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून केले जाणार आहे.

5500 families get electric connection in Nanded district through soubhagya project | ‘सौभाग्य’ योजनेद्वारे नांदेड जिल्ह्यातील साडेपाच हजार कुटुंबांना मिळणार वीजजोडणी

‘सौभाग्य’ योजनेद्वारे नांदेड जिल्ह्यातील साडेपाच हजार कुटुंबांना मिळणार वीजजोडणी

googlenewsNext

नांदेड : ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात अद्यापपर्यंत वीज न पोहोचलेल्या ५ हजार ५२५ कुटुंबाना वीजजोडणी देवून त्यांचे जीवनमान प्रकाशमान करण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून केले जाणार आहे.

नागरिकांना २४ तास वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थात 'सौभाग्य' योजना सुरू केली. योजनेंतर्गत डिसेंबर-२०१८ पर्यंत सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे अभियान सुरू करण्यात आले असून त्या अनुषंगाने महावितरणने कामे करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात वीज जोडणीपासून अद्यापपर्यंत वंचीत असलेल्या ५ हजार ५२५ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यासाठी ५१ कोटी १३ लाख रूपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये भोकर विभागातील २ हजार १२४ कुटुंबाचा तर नांदेड शहर विभागातील ३२३ आणि नांदेड ग्रामीण विभागातील ३ हजार ७८ कुटुंबांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व कुटुंबांना वीजपुरवठा देण्यासाठी २१४ किलोमिटरची उच्चदाब वाहिनी तसेच ५४८ कि.मी.ची लघूदाब वाहिनींचा समावेश असून तब्बल १ हजार २५५ रोहित्रांची उभारणी योजनेंतर्गत केली जाणार आहे. 

सदर योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना (दारिद्र्य रेषेखालील) कुटुंबांना मोफत वीज जोडणीसोबतच ९ वॅटचा एक एलईडी बल्ब आणि एक पिनपॉईंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना ५०० रुपयांमध्ये वीजपुरवठा दिला जाणार असून हे शुल्कही नियमित वीजबिलांसोबत १० सामान हप्त्यांत भरावयाचे आहे.

Web Title: 5500 families get electric connection in Nanded district through soubhagya project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.