नांदेड जिल्ह्यात पाणीपुरी खाल्ल्याने ५७ जणांना विषबाधा; रुग्णात लहानमुलांची संख्या जास्त

By शिवराज बिचेवार | Published: April 15, 2023 07:32 PM2023-04-15T19:32:01+5:302023-04-15T19:33:21+5:30

पाणीपुरी विकणाऱ्याकडून पाणीपुरीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत

57 people poisoned due to Panipuri; Incident in Chabhra village of Nanded district | नांदेड जिल्ह्यात पाणीपुरी खाल्ल्याने ५७ जणांना विषबाधा; रुग्णात लहानमुलांची संख्या जास्त

नांदेड जिल्ह्यात पाणीपुरी खाल्ल्याने ५७ जणांना विषबाधा; रुग्णात लहानमुलांची संख्या जास्त

googlenewsNext

पार्डी (नांदेड) : अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील ५७ जणांना पाणीपुरी खाल्ल्यामुळे विषबाधा झाली. या सर्वांना मळमळ व उलट्या, अतिसार सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने चाभरा, अर्धापूर व नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

१४ एप्रिल रोजी चाभरा गावातील गावकऱ्यांनी पाणीपुरी खाल्ली होती. परंतु १५ एप्रिल रोजी सकाळी मळमळ व उलट्या होण्यास सुरुवात झाली. काही जणांना उलट्या व अतिसार सुरू झाल्याने गावकरी घाबरून गेले. काही जणांना उलट्या व अतिसाराचे प्रमाण वाढल्याने त्यांना अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तर दोघांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले.

पाणीपुरीवाल्याकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झालेल्यांची संख्या मोठी आहे. यांत लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. आज सकाळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चाभरा येथे येऊन पाहणी केली. तसेच पाणीपुरी विकणाऱ्या व्यक्तीकडून पाणीपुरीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. संदेश कदम, डॉ. जनार्धन टारफे, डॉ. मुस्तपुरे, आरोग्य सेविका टरके, सतीश जाधव आदींनी गावातील सर्व विषबाधित रुग्णांची तपासणी केली. चाभरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात -४७, अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात - ८, नांदेड येथे खासगी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहे. यामध्ये ११ लहान मुले आहेत तर ४६ मोठ्या व्यक्तीचा समावेश आहे. यात महिला व पुरुषही आहेत.

Web Title: 57 people poisoned due to Panipuri; Incident in Chabhra village of Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.