जिल्ह्यातील ५९ हजार लोकांनी कोरोनाला हरवून दाखविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:17 AM2021-04-25T04:17:35+5:302021-04-25T04:17:35+5:30
पॉझिटिव्हिटी रेटही झाला कमी मागील काही दिवसात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट चिंता वाढविणारा होता. मात्र आता हा रेटही कमी होत ...
पॉझिटिव्हिटी रेटही झाला कमी
मागील काही दिवसात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट चिंता वाढविणारा होता. मात्र आता हा रेटही कमी होत आहे. सध्या हा रेट २८.०६ एवढा असून, यामध्येही दिवसेंदिवस कमी येत आहे.
कोट...........
अनेकजण अहवाल बाधित आल्याचे समजल्यानंतर घाबरुन जातात. मात्र कोरोना हा आजार इतर फ्लू प्रमाणेच सामान्य आहे. फक्त यात वेळीच तपासणी आणि योग्य ते उपचार घेण्याची गरज आहे. बाधित रुग्णांचे नातेवाईक तसेच शेजारी यांनी अशा काळात रुग्णाला धीर देण्याची, त्याचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. रुग्णांने ही सकारात्मक मानसिकता ठेवून उपचाराला सामोरे जायला हवे. तसे झाल्यास गुंतागुंत न वाढता, रुग्ण अवघ्या काही दिवसात कोरोनावर मात करु शकतो. - डॉ. रामेश्वर बोल्ले, मानसोपचार तज्ज्ञ.
रविवार १,१५६
सोमवार १,२०५
मंगळवार १,०१५
बुधवार १,२१९
गुरुवार १,२९३
शुक्रवार १,३३७
शनिवार १,२८५