कंधारात महावितरणचे ६ कर्मचारी कोरोनाबाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:13 AM2021-01-01T04:13:30+5:302021-01-01T04:13:30+5:30

१० लक्ष लोकसंख्येच्या मागे ५६० कोरोना चाचणी होणे अपेक्षित असताना तसे होत नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून पंचायत समिती, आरोग्य ...

6 MSEDCL employees injured in Kandahar | कंधारात महावितरणचे ६ कर्मचारी कोरोनाबाधीत

कंधारात महावितरणचे ६ कर्मचारी कोरोनाबाधीत

Next

१० लक्ष लोकसंख्येच्या मागे ५६० कोरोना चाचणी होणे अपेक्षित असताना तसे होत नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून पंचायत समिती, आरोग्य विभाग बँका, तहसील, कृषी, पोलीस, आगार, आयसीडीएस, महावितरण आदी कार्यालयांतील अधिकारी- कर्मचारी यांची तसेच फळ व भाजीपाला विक्रेते, कापड व किराणा दुकानदारांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आगारातील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यात १ जण पॉझिटिव्ह आढळला. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांची चाचणी घेण्यात आली. ३० डिसेंबर रोजी महावितरणमधील अधिकारी- कर्मचारी अशा ३४ जणांची चाचणी घेण्यात आली. त्यात ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. एकमेकांच्या सोबत राहून काम केलेले काही जण बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. सारी, आयएलआय व संशयित क्षयरुग्णांची प्राधान्याने कोरोना चाचणी करण्याचे सुद्धा निर्देश आहेत. त्यामुळे विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचणी घेऊन सर्वांचे आरोग्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु चाचणीला सकारात्मक प्रतिसाद देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: 6 MSEDCL employees injured in Kandahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.