लोहा तालुक्यातील ६० कोटींच्या धोंड सिंचन प्रकल्पास मंजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:32 AM2018-03-24T00:32:09+5:302018-03-24T11:56:21+5:30
लोहा तालुक्यातील माळाकोळी जिल्हा परिषद सर्कलमधील आष्टूर परिसराला वरदान ठरणाऱ्या ५९ कोटी ४७ लाख रुपये किंमतीच्या धोंड साठवण तलावास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. सदर प्रकल्पाचे काम आगामी तीन वर्षात पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांनी संबंधित विभागाला दिल्याची माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. मागील 30 वषार्पासून सदर प्रकल्पाची मागणी होत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : लोहा तालुक्यातील माळाकोळी जिल्हा परिषद सर्कलमधील आष्टूर परिसराला वरदान ठरणाऱ्या ५९ कोटी ४७ लाख रुपये किंमतीच्या धोंड साठवण तलावास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. सदर प्रकल्पाचे काम आगामी तीन वर्षात पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांनी संबंधित विभागाला दिल्याची माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. मागील 30 वषार्पासून सदर प्रकल्पाची मागणी होत होती.
पालम व लोहा तालुक्याच्या सीमेवरील प्रस्तावित धोंड सिंचन प्रकल्पास राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात नाशिक येथील कार्यालयातून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मंजूर झाले होते. या प्रकल्पात ९.०१ दलघमी पाणी साठा उपलब्ध होणार आहे. पाणीसाठ्यामुळे माजलगांव उजवा कालव्यावरुन लोहा-पालम परिसरातील १७५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्याचा सर्वाधिक लाभ लोहा तालुक्यातील आष्टूर, लव्हराळा, रिसनगांव, रामतीर्थ, मुरंबी, सावरगांव आदि दहा गावांना होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंधार येथील दौºयात धोंड साठवण तलावासह किवळा साठवण तलाव, लिंबोटी धरणाच्या उर्वरीत कामासाठी निधी मंजूर करण्याची घोषणा केली होती. याबरोबरच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना स्वतंत्र बैठक घेवून हा प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले होते. २२ फेब्रवारी रोजी जलसंपदा मंत्र्यांनी आपल्या दालनात बैठक घेवून धोंड साठवण तलावास 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. लिंबोटी धरणास ७३ कोटी तर किवळा साठवण तलावास ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुंबई येथे झालेल्या या बैठकीस आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे, जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, चंद्रशेन पाटील, लोहा तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष गणेश सावळे यांच्यासह पाटबंधारे विभागातील अधिकाºयांची उपस्थिती होती.
लवकरच या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ होणार असल्याचेही चिखलीकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस केशवराव पाटील आष्टूरकर, जि.प. सदस्या प्रणिताताई देवरे, चंद्रशेन पाटील, गणेश सावळे, लोहा पंचायत समितीचे उपसभापती बालाजी पाटील, शरद पवार, लोह्याचे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार आदिंची उपस्थिती होती.