६३७ विद्यार्थिनींना मिळणार मोफत सायकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:18 AM2021-05-19T04:18:04+5:302021-05-19T04:18:04+5:30
प्रगती माध्यमिक विद्यालय सुगाव ३४, शांतीवर्धक हायस्कूल मानूर २१, शांती वर्धक हायस्कूल कुन्मारपल्ली ३३, एकता माध्यमिक विद्यालय देगाव १६, ...
प्रगती माध्यमिक विद्यालय सुगाव ३४, शांतीवर्धक हायस्कूल मानूर २१, शांती वर्धक हायस्कूल कुन्मारपल्ली ३३, एकता माध्यमिक विद्यालय देगाव १६, प.पु. गोळवलकर गुरुजी विद्यालय देगलूर २८, ईल यासीन उर्दू हायस्कूल देगलूर २९, इंदिराबाई माध्यमिक विद्यालय हणेगाव ३३, लाल बहादूर शास्त्री विद्यालय वझर १४, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय देगलूर १२, गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल २९, नेताजी सुभाष विद्यालय तमलूर २, सरस्वती माध्यमिक विद्यालय देगलूर २१, छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय भायेगाव २४, शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळी ८, जिल्हा परिषद हायस्कूल शहापूर ४१, जिल्हा परिषद हायस्कूल मुलांचे देगलूर १३, मौलाना अबुल आझाद उदूर् हायस्कूल देगलूर ५४, माध्यमिक विद्यालय रावणगाव (पुनर्वसित खानापूर) ९, सावित्रीबाई फुले मुलींची माध्यमिक शाळा हणेगाव ५७, कै. व्यंकटराव देशमुख माध्यमिक विद्यालय शिळवणी २५, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय मरखेल ४४, मदनेश्वर विद्यालय लोणी १८, महात्मा बसवेश्वर विद्यालय नरनगल १५, साधना हायस्कूल देगलूर १, संत गाडगेबाबा पंचपुरा माध्यमिक विद्यालय माळेगाव ३६ याप्रमाणे सायकली मंजूर झालेल्या असून लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणािधकारीजाधवर यांनी दिली.
गटशिक्षणाधिकारी राजकुमार जाधवर यांची माहिती
ज्या भागात मानव विकास मिशन योजनेच्या बस फेऱ्या होत नाहीत. अशा ठिकाणी ५ कि.मी. अंतरापर्यंत शिक्षणासाठी जाणाऱ्या इयत्ता आठवी ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना सदर योजनेत मोफत सायकलींचा लाभ दिला जातो. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी वेळोवेळी मुख्याध्यापकांची बैठक घेऊन अचूक प्रस्तावासाठी मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त सायकलींचा लाभ शिक्षण घेणाऱ्या मुलींना देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक सायकली मंजूर झालेल्या आहेत.
- राजकुमार जाधवर, गटशिक्षणाधिकारी देगलूर
मागील आठ वर्षात मंजूर झालेल्या सायकलींची संख्या
सन २०१३-१४ साली ४१४ सायकल, २०१५-१६ साली २५८, सन २०१६-१७ साली २८१, सन २०१७-१८ साली २४२, स २०१८-१९ साली ३२५, सन २०१९-२० साली ४७३, सन २०२०-२१ साली ६३७ सायकली मंजूर झाल्या होत्या. तरसन २०१४-१५ साली जिल्ह्यात मंजुरी नव्हती.