जिल्ह्यात कोरोनाचे ६६१ नवे रुग्ण, १७ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:18 AM2021-05-07T04:18:52+5:302021-05-07T04:18:52+5:30
जिल्ह्यात १७ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. त्यामध्ये मुखेडमधील ६४ वर्षीय पुरुष, धर्माबादमधील ६५ वर्षीय पुरुष, लोह्यातील ४२ वर्षीय पुरुष, ...
जिल्ह्यात १७ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. त्यामध्ये मुखेडमधील ६४ वर्षीय पुरुष, धर्माबादमधील ६५ वर्षीय पुरुष, लोह्यातील ४२ वर्षीय पुरुष, अर्धापूर येथील ५७ वर्षीय पुरुष, उमरी येथील ४६ वर्षीय पुरुष, मुखेड येथील ७५ वर्षीय पुरुष, नायगाव तालुक्यातील कोपरा येथील ५० वर्षीय महिला, नायगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील ५२ वर्षीय महिला, कंधार तालुक्यातील बारुळ येथील ५५ वर्षीय पुरुष, नांदेड हिंगोलीगेट येथील ८५ वर्षीय महिला, सिडकोतील ६३ वर्षीय पुरुष, मुखेड तालुक्यातील राजुरा येथील ६५ वर्षीय महिला, नांदेडमधील गवळीपुरा येथील ८० वर्षीय पुरुष, श्रीनगर येथील ५९ वर्षीय पुरुष, डोंगरगाव येथील ७० वर्षीय पुरुष आणि हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात गुरुवारी १ हजार २७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १५, जिल्हा रुग्णालय कोविड हाॅस्पिटलमधील १३, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील ८, मनपाच्या एनआरआय भवन, जम्बो कोविड सेंटर तसेच गृहविलगीकरणातील ८०९, मुखेड कोविड रुग्णालयातील १९, नायगाव २, धर्माबाद १२, मुदखेड १२, कंधार ६, देगलूर ५, किनवट ४६, भोकर ४४, अर्धापूर ३०, हिमायतनगर ५, लोहा २२, उमरी ३२, बिलोली ६१, बारड २, माहूर १५ आणि खासगी रुग्णालयातील ११५ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात ६ हजार ७७२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील १९८ जणांची प्रकृती गंभीर बनली आहे. गृह विलगीकरणात मनपा अंतर्गत २ हजार १११, विविध तालुक्यांतर्गत २ हजार १८७ रुग्ण उपचार घेत आहेत.