किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांमध्ये ७.२३ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:24 AM2019-06-26T00:24:34+5:302019-06-26T00:25:05+5:30

जून महिन्याची २५ तारीख उजाडली तरी किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांत सरासरी ७.२३ टक्के इतकाच जलसाठा आहे. दहा प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे.

7.23 percent water in 19 projects in Kinwat taluka | किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांमध्ये ७.२३ टक्के पाणी

किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांमध्ये ७.२३ टक्के पाणी

googlenewsNext

किनवट : जून महिन्याची २५ तारीख उजाडली तरी किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांत सरासरी ७.२३ टक्के इतकाच जलसाठा आहे. दहा प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. एक मध्यम प्रकल्पही जोत्याखाली येण्याच्या स्थितीत असल्याने मोठा पाऊस वेळीच झाला नाही तर भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
कधी नव्हे ते यावर्षी प्रकल्पातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. २०१८ च्या पावसाळ्यात झालेला कमी पाऊस हे त्याला कारणीभूत आहे. तर बहुतांश प्रकल्पांत पाणी कमी, गाळाचे प्रमाण अधिक असल्याने प्रकल्प कोरड्या स्थितीत दिसून येत आहेत.
तालुक्यातील कुपटी, मुळझरा, थोरा, जलधारा, नांदगाव, अंबाडी, वरसांगवी, सावरगाव, शिरपूर, मांडवी या दहा प्रकल्पांनी तळ गाठला आहे. जोत्याखाली पाणी आले आहे तर डोंगरगाव या मध्यम प्रकल्पातही केवळ १.२३ टक्के इतकाच जलसाठा आहे. त्यामुळे वेळीच मोठा पाऊस पडला नाही तर हा प्रकल्पही जोत्याखाली येण्यास वेळ लागणार नाही.
सद्य:स्थितीत असलेला प्रकल्पनिहाय जलसाठा याप्रमाणे-नागझरी (१६.००), लोणी (१९.१३), निचपूर (१६.६६), सिंदगी (१६.९४), हुडी (१०.३८), पिंपळगाव (की) (१०.६६), निराळा (३६.७०), पिंपळगाव (भि) (९.६८).
१८ प्रकल्पांत सद्य:स्थितीत केवळ ७ टक्के इतकाच जलसाठा आहे, हे विशेष! रोहिणी, मृग हे नक्षत्र कोरडे गेले आहे. आता २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्र सुरु झाले आहे. किनवट तालुक्यातील शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
किनवट तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडीतांडे असून वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलीमीटर इतके आहे. ८२ हजार ३६० हेक्टर इतके खरीप हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र असून जूनअखेरपर्यंत १७७ मिमी इतका पाऊस पडावयास हवा आहे़ पण, आजही पावसाची प्रतिक्षा आहे़

Web Title: 7.23 percent water in 19 projects in Kinwat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.