अंडवृद्धीच्या ७४६ रुग्णांवर लवकरच शस्त्रक्रिया होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:15 AM2020-12-23T04:15:17+5:302020-12-23T04:15:17+5:30
लॉकडाऊनदरम्यान अनेक आजारांच्या शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या. मात्र, हळूहळू शस्त्रक्रिया करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होत आहे. मागील सहा ते ...
लॉकडाऊनदरम्यान अनेक आजारांच्या शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या. मात्र, हळूहळू शस्त्रक्रिया करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होत आहे. मागील सहा ते आठ महिन्यांदरम्यान जिल्ह्यात अंडवृद्धीचे ७४६ व हत्तीरोग आजाराचे दाेन हजार ५५३ रुग्ण असे एकूण तीन हजार २९९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर टप्प्याटप्प्याने पुढील तीन महिन्यांत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाकडून प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठीची सर्व आकडेवारी एकत्रित करून ती जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या स्वाक्षरीनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे स्वाक्षरीसाठी जाणार आहे. त्यानंतर कोणत्या रुग्णास कधी शस्त्रक्रियेसाठी बोलवायचे हे ठरविण्यात येणार आहे.
चौकट.........
९१ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण
राज्यातील नांदेडसह चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, लातूर, अमरावती या जिल्ह्यांत अंडवृद्धी व हत्तीरोग आजराचे रुग्ण आढळले असून, राज्यातील एकूण रुग्णांमध्ये हे प्रमाण ९१ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.