माहूर गडावर जाण्यास ७५ बसेसची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:06 AM2018-12-14T01:06:41+5:302018-12-14T01:07:10+5:30

तीर्थक्षेत्र माहूर गडावर २२ ते २४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या दत्त जयंती उत्सवाला लाखो भाविक दाखल होणार असून यात्रेच्या निमित्ताने सर्व संबंधित विभागाची तयारी आढावा बैठक १३ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

75 buses to reach Mahur fort | माहूर गडावर जाण्यास ७५ बसेसची सुविधा

माहूर गडावर जाण्यास ७५ बसेसची सुविधा

googlenewsNext

श्रीक्षेत्र माहूर : तीर्थक्षेत्र माहूर गडावर २२ ते २४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या दत्त जयंती उत्सवाला लाखो भाविक दाखल होणार असून यात्रेच्या निमित्ताने सर्व संबंधित विभागाची तयारी आढावा बैठक १३ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
दत्त जयंती महत्सोवच्या अनुषंगाने यापूर्वी ६ डिसेंबर रोजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत बोटावर मोजण्या इतकेच अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर गुरूवारी दुपारी ३ वाजता सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीला ब-याच प्रमाणात अधिकारी उपस्थित होते़ या बैठकीत परिवहन महामंडळाकडून माहूर शहरा पासून गडावर जाण्यास ७५ बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली. या शिवाय तीन ठिकाणी बसथांबे असून या मध्ये बसस्थानक पेट्रोल पंप, टी पाईंट तर आरोग्य विभागाकडून ठिकठिकाणी आरोग्य पथक व रुग्णवाहिकेची सोय करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भिसे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ व्हीं. एन.भोसले यांनी दिली़ सार्वजनिक बांधकाम विभाकडूा रस्ते सुरळीत करण्यात आले असल्याचे उप अभियंता बेबरे यांनी सांगितले. दर दोन दिवसाआड शहरात पाणी पुरवठा करण्यात येईल व स्वच्छतेबाबत काळजी घेण्यात येणार आहे.
यात्रेचा आढावा घेत सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यात्रा काळात भाविकांची गैरसोय होवु नये म्हणुन सर्व विभाग प्रमुखांचे समन्वय असावे म्हणून व्हाटसप ग्रूप तयार करून २४ तास सजग राहण्याचे आदेश दिले. या वेळी प्रभारी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी विशाल शिह चौहान, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही़ एऩ भोसले, तालुका आरोग्य अधिकारी एस.बी.भिसे, माहावितरण पंकज देशमुख सार्वजनिक बांधकाम विभाचे ओ.एम बेंबरे,एपीआय मल्हार शिवरकर आदी उपस्थित होते़
श्री दत्तात्रय संस्थानचे कार्यक्रम
१८ डिसेंबर रोजी पहिली पालखी, दुसरी पालखी १९ रोजी व तिसरी पालखी २० रोजी रात्री ७ वाजता निघणार आहे. २१ डिसेंबर रोजी दत्त जन्म दुपारी १२ ते २ आणि रात्री चौथी पालखी निघेल़ २२ रोजी उत्सव पौर्णिमा व ५ व पालखी निघेल. २३ रोजी दहीहंडी व गोपाळकाला कार्यक्रम, २४ डिसेंबर रोजी काकड आरतीने दत्त उत्सवाची सांगता होईल.

Web Title: 75 buses to reach Mahur fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.