किनवट नगरपालिकेकडे वीजबिलाचे ८ लाख थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:02 AM2019-03-10T00:02:34+5:302019-03-10T00:05:26+5:30
वीज वितरण कंपनीची किनवट नगर परिषदेकडे पाणीपुरवठ्याची सात ते आठ लाख रुपये थकबाकी असून ती मार्च महिन्यात न भरल्यास पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यामुळे नगरपालिकेचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे.
किनवट : वीज वितरण कंपनीची किनवट नगर परिषदेकडे पाणीपुरवठ्याची सात ते आठ लाख रुपये थकबाकी असून ती मार्च महिन्यात न भरल्यास पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यामुळे नगरपालिकेचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पालिकेचे लेखापाल गेल्या सप्ताहभरापासून विनापरवानगी गैरजहर असल्याने पालिकेचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले. घनकचरा व्यवस्थापन, घरकुल योजना, पाणीपुरवठा बिल, कंत्राटदाराचे देयके, दैनंदिन किरकोळ खर्च, विद्युत देयके, जाहिरातीचे देयके व इतर आवश्यक बाबींचा खर्च पूर्णत: ठप्प झाला. अठरा ते बावीस विविध योजनांची खाते ही मुख्याधिकारी व लेखापाल यांचे संयुक्त खाते आहे.
लेखापाल विनापरवानगी अनुपस्थितीत आहेत- एम. जे. लोखंडे, प्रभारी मुख्याधिकारी
वीज वितरणची थकबाकी भरण्यासाठी लवकरच पालिकेला नोटीस बजावली जाईल- एस.पी. गंधे, सहाय्यक अभियंता, किनवट