८० हजारांचे अवैध सागवान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:22 AM2019-03-08T00:22:38+5:302019-03-08T00:23:10+5:30
लाकूर तस्करीसाठी प्रसिद्ध असलेल्या चिखली (बु.) जंगलातील सागवान तोडून तिची बैलगाडीद्वारे वाहतूक केली जात होती. वनविभाग, व राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी ६ मार्च रोज मलकवाडी येथे छापा मारुन सदर लाकूड जप्त केले.
किनवट : लाकूर तस्करीसाठी प्रसिद्ध असलेल्या चिखली (बु.) जंगलातील सागवान तोडून तिची बैलगाडीद्वारे वाहतूक केली जात होती. वनविभाग, व राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी ६ मार्च रोज मलकवाडी येथे छापा मारुन सदर लाकूड जप्त केले. जवळपास ८० हजाराचा ऐवज जप्त झाला.
काही सागवान तस्कर चिखली बु. जंगालातील सागवानाची झाडे तोडून ती बैलगाडीद्वारे गावात नेत असल्याची गुप्त माहिती किनवटचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे यांना मिळाली. त्यावरुन फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल शेळके, बोधडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव व राज्य राखीव पोलिस दलाचे उपनिरीक्षक जाधव तसेच किनवट व बोधडी वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे मलकवाडी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. पथकाला पाहून तस्करांनी लाकडाने भरलेल्या बैलगाड्या तेथेच सोडून पळ काढला़
वनविभागाने सुमारे ८० हजार रुपये किमतीचे १४ गोल नग जप्त केले़ ही कामगिरी वनपाल बी़ए़संतवाले, बी़टी़ जाधव, शेख याकूब, वनरक्षक एस़डी़ घोरबांड, एम़जी़ सोनार, आऱबी़ दांडेगावकर, एक़े़ फुले, एनक़े़ चुकलवार, सुनील कराळे, साईदास पवार, अमोल गवळी, देव कांबळे, काळे, गुट्टे, नागरे, गडवे, वनमजूर राठोड, केंद्रे, राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस कर्मचारी किनवट व बोधडी वनपरिक्षेत्राचे कर्मचारी यांनी बजावली़