८१ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दुय्यम निबंधकासह तिघांना अटक; हदगावात कारवाई

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: July 12, 2024 11:57 PM2024-07-12T23:57:22+5:302024-07-12T23:57:58+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंंगेहाथ पकडले

81,000 bribe-taking 3 arrested including second registrar; Action in Hadgaon | ८१ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दुय्यम निबंधकासह तिघांना अटक; हदगावात कारवाई

८१ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दुय्यम निबंधकासह तिघांना अटक; हदगावात कारवाई

रामेश्वर काकडे, नांदेड: शेतजमिनीच्या रजिस्ट्रीसाठी १ लाख ९९ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या हदगाव येथील दुय्यम निबंधकास ८१ हजार ६०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने शुक्रवार, १२ जुलैला हदगाव येथे करण्यात आली. याप्रकरणी आरोपी दुय्यम निबंधक बालाजी शंकरराव उत्तरवार याच्यासह तीन आरोपींना अटक केली आहे. तक्रारदारांनी हदगाव येथील गट क्रमांक २५६-२ मध्ये २० गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. शेतजमिनीच्या रजिस्ट्रीकरिता हदगाव येथील दुय्यम निबंधक उत्तरवार यांना भेटले असता त्यांनी रजिस्ट्रीसाठी १ लाख ९९ हजार नोंदणी व मुद्रांक फीसह लाचेची मागणी केली. पण, तडजोडीअंती १ लाख ९५ हजार देण्याचे ठरले. ही रक्कम समीउल्ला अजमतउल्ला शेख यांच्याकडे देण्याचे सांगितले.

पण, तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १२ जुलैला तक्रार दिली. त्यावरून लाचेची पडताळणी केली असता समीउल्ला यांनी १ लाख ९५ हजारांची लाच उपनिबंधक कार्यालय आवारात स्वीकारून आरोपी शेख अबूबकर याच्याजवळ दिली. त्यानंतर नोंदणी व मुद्रांक फी भरल्याची १ लाख १३ हजार ४०० रुपयांची पावती दिली. याप्रकरणात उत्तरवार यांनी नोंदणी व मुद्रांक फीच्या नावाखाली ८१ हजार ६०० रुपयांची लाच समीउल्ला यांच्याद्वारे स्वीकारली. याप्रकरणी दुय्यम निबंधक बालाजी उत्तरवार, मुद्रांक विक्रेता समीउल्ला अजमतउल्ला शेख ऊर्फ शमी व मुद्रांक विक्रेता शेख अबूबकर करीम सिद्दीकी ऊर्फ बाबू या तीनही आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही सापळा कारवाई पोलिस अधीक्षक डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक प्रशांत पवार, पोलिस निरीक्षक प्रीती जाधव यांच्या पथकाने केली.

Web Title: 81,000 bribe-taking 3 arrested including second registrar; Action in Hadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड