जिल्ह्यात ८२ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:21 AM2021-08-23T04:21:24+5:302021-08-23T04:21:24+5:30
नांदेड तालुक्यात ७७.४९ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. मुखेड तालुक्यात ८२.७८, कंधार ७८.२३, लोहा ८७.९०, हदगाव ८१.३३, भोकर ७८.९५, ...
नांदेड तालुक्यात ७७.४९ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. मुखेड तालुक्यात ८२.७८, कंधार ७८.२३, लोहा ८७.९०, हदगाव ८१.३३, भोकर ७८.९५, देगलूर ८३.२२, किनवट ९२.९२, मुदखेड ८७.७०, हिमायतनगर ८६.८३, माहूर ७९, उमरी तालुक्यात ८४.३७ टक्के आणि अर्धापूर तालुक्यात ९५.३४ टक्के पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १४.८० मि.मी. पावसाची नोंद झाली. मुखेड आणि नायगाव या दोन तालुक्यांत मुसळधार तर बिलोली, मुदखेड, हदगाव, उमरी, देगलूर, हिमायतनगर, नांदेड या तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७३०.८० मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८९१.३० मि.मी. इतकी आहे. आजघडीला ५७५.२० मि.मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात तो ७३०.८० मि.मी. इतका झाला आहे.
प्रारंभी अतिवृष्टीने खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर पावसाने जवळपास २० दिवस उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकरी चिंतित झाले होते. फूलधारणेत आलेले सोयाबीन पावसाअभावी सुकून जाऊ लागले होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने पुन्हा एकदा खरीप पिकांनी उभारी घेतली आहे. सोयाबीनसह मूग, उडीद, कापूस, ज्वारी, तूर ही पिके बहरली असल्याचे कृषी विभागाने कळवले आहे. नांदेड जिल्ह्यात ऑगस्टमध्येच एकूण सरासरीच्या ८२ टक्के पाऊस झाला आहे. यात धर्माबाद तालुक्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली असून येथे १०१.१७ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ८९१.३० मि.मी. सरासरी वार्षिक पाऊस होतो. आतापर्यंत ५७५.२० मि.मी. पाऊस झाला आहे. यात धर्माबाद तालुक्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. तालुक्यात सरासरी ८०६.४० मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. येथे आजघडीला ८१५.८० मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तब्बल १०१.१७ टक्के पाऊस धर्माबाद तालुक्यात झाला आहे. त्याखालोखाल ९३.९८ टक्के पाऊस बिलोली तालुक्यात झाला आहे. बिलोली तालुक्यात ९१०.९० मि.मी. सरासरी पाऊस पडतो. येथे ८५२.४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. किनवट तालुक्यात सर्वाधिक १ हजार २६.६० मि.मी. सरासरी पाऊस पडतो. आतापर्यंत ९५३.९० मि.मी. पाऊस झाला असून ९२.९२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अर्धापूर तालुक्यातही ९५.३४ टक्के पाऊस झाला आहे. येथे ७९३.६० मि.मी. सरासरी पाऊस होतो. आतापर्यंत ७५६.६० मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण पावसाच्या ९५.३४ टक्के पाऊस तालुक्यात झाला आहे. नायगाव तालुक्यातही चांगला पाऊस झाला आहे. येथे ६६०.६० मि.मी. पाऊस झाला असून तालुक्यात सरासरी ७२३.५० पाऊस अपेक्षित आहे.