८२१ वीजचोरांना कारवाईचा शॉक
By admin | Published: February 13, 2015 03:12 PM2015-02-13T15:12:05+5:302015-02-13T15:12:05+5:30
शहर विभागातील विजेची वितरण व वाणिज्यीक हानी अधिक असणार्या व भारनियमनातील एफ आणि जी गाटातील १८ फिडरवर २ ते ११ फेब्रुवारी २0१५ दरम्यान महावितरणने मोहीम राबवून वीजचोर शोध उपक्रम राबविला.
नांदेड : शहर विभागातील विजेची वितरण व वाणिज्यीक हानी अधिक असणार्या व भारनियमनातील एफ आणि जी गाटातील १८ फिडरवर २ ते ११ फेब्रुवारी २0१५ दरम्यान महावितरणने मोहीम राबवून वीजचोर शोध उपक्रम राबविला. या दहा दिवसाच्या मोहीमेत १५ हजार ६0८ ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात येवून ८२१ ग्राहकांवर भारतीय विद्युत कायदा २00३ च्या कलम १२६ आणि १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
नांदेड शहरातील विजेची अतिहानी असलेल्या शहरातील सर्व उपविभागातील १८ फिडरवर मुख्य अभियंता आर.जी.शेख व अधिक्षक अभियंता डी.डी.हामंद यांच्या सूचनेप्रमाणे कार्यकारी अभियंता डी.एच.आग्रवाल आणि त्यांच्या अधिपत्याखाली अधिकारी व कर्मचार्यांनी वीजचोरी तपासणी मोहीम राबविली. गणेशानगर, चैतन्यनगर, नागार्जूना-एअरपोर्ट, सांगवी, महावीर सोसायटी, बिलालनगर, खुदबईनगर, टॉवर, खडकपूरा, रेल्वेट्रॅक, नागापूर गावठाण, गोपाळचावडी, चौफाळा, वाजेगाव, निळा, लिंबगाव, नाळेश्वर आणि मातासाब या फिडरवर ही मोहीम राबविण्यात आली. दहा दिवस चाललेल्या या मोहीमेत एकूण १५ हजार ६0८ ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात येवून त्यात भारतीय विद्युत कायदा २00३ च्या कलम १२६ अतंर्गत ५७६ तर कलम १३५ नुसार २४५ वीज ग्राहकाविरुद्ध वीजचोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली. तसेच २८६ जणांचे वीज चोरीसाठी टाकलेले तारेवरचे आकडे काढण्यात आले.वीजचोराविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असल्याने याचा वीजचोरी कमी होण्यास मदत होणार आहे. /(प्रतिनिधी)
■ मोहीमेत नांदेड मंडळातील २६0 तर नांदेड शहर विभागातील ९0 जनमित्र आणि विद्युत सहायकांनी काम केले. त्यांच्यावर १८ सहाय्यक अभियंत्याचे थेट नियंत्रण होते