शिरूरमध्ये भरदुपारी ८५ वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरुन हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 19:52 IST2020-02-25T19:51:01+5:302020-02-25T19:52:20+5:30
ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे

शिरूरमध्ये भरदुपारी ८५ वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरुन हत्या
उमरी : तालुक्यातील शिरूर येथे भरदुपारी एका ८५ वर्षे वृद्ध महिलेचा गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. कृष्णाबाई पुंडलिक पडोळे असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मागे कृष्णाबाई पडोळे ही वृद्ध महिला राहते. मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे घरकाम करत होत्या. यावेळी अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून त्यांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील , सहाय्यक पोलिस निरीक्षक आर . टी. शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब होते. यावरून ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून तपास सुरु आहे. दरम्यान, कृष्णाबाई या घरात एकट्याच राहत असत. त्यांच्या पश्चात ५ विवाहित मुली आहेत.