मुखेड आगाराला ९० लाखांचा फटका; कर्मचाऱ्यांचे वेतन नांदेड विभागाकडून मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 06:49 PM2018-08-11T18:49:47+5:302018-08-11T18:50:33+5:30
सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा येथील एसटी आगाराला मोठा फटका बसला आहे़
- दत्तात्रय कांबळे
मुखेड : सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा येथील एसटी आगाराला मोठा फटका बसला आहे़ आंदोलन काळात तब्बल ९० लाखांचा फटका बसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन नांदेड विभागाकडून मागविण्यात आले आहे़.
मुखेड तालुक्यात २४ जुलै ते ९ आॅगस्टदरम्यान झालेल्या आंदोलनामुळे आगाराच्या उत्पनावर मोठा परिणाम झाला आहे़ या काळात झालेल्या आंदोलनामुळे तब्बल ९० लाखांच्या जवळपास नुकसान झाले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लागणारे उत्पन्नही निघाले नाही़ त्यामुळे २० लाख रूपयांची मागणी नांदेड विभागाकडे करण्यात आली आहे़
मुखेड आगारात मागील वर्षी ६६ बसगाड्या होत्या. तर यंदा तर ५७ गाड्या आहेत़ तालुक्यातील १५२ गावांच्या व बाहेरील तालुक्यातील प्रवाशांची एसटीवरच मदार आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनात आलूवडगाव येथे एक बस जाळली़ तर एक बस गंगनबीड-कुंटूर फाटा येथे काचा फोडून नुकसान केले. यात जळालेल्या गाडीचे ३० लाख व काच फोडलेल्या गाडीचे २० हजारांचे नुकसान झाले. २४ जुलै रोजी मुखेड आगाराकडून एसटी बंद ठेवण्यात आली होती. २८ जुलै रोजी दुपारी बंद, २९ जुलैला सकाळी बंद, ३१ जुलै रोजी मुखेड आगाराची गाडी जाळल्याने दुपारनंतर बंद ठेवण्यात आले़ १ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान नांदेडसाठी ५ गाड्या सोडण्यात आल्या होत्या़ ९ आॅगस्टला तर चक्का जाम आंदोलनामुळे शंभर टक्के बंद पाळण्यात आला़ या सर्व घटनेमुुळे मुखेड आगारास ९० लाखांचा फटका बसला आहे.
२४ जुलै ते ९ आॅगस्टदरम्यान गाड्या बंद
२४ जुलै रोजी मुखेड आगाराकडून एसटी बंद ठेवण्यात आली होती. २८ जुलै रोजी दुपारी बंद, २९ जुलैला सकाळी बंद, ३१ जुलै रोजी मुखेड आगाराची गाडी जाळल्याने दुपार नंतर बंद ठेवण्यात आले़ १ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान नांदेडसाठी ५ गाड्या सोडल्या होत्या़ ९ आॅगस्टला तर चक्का जाम आंदोलनामुळे शंभर टक्के बंद पाळण्यात आला़ या सर्व घटनांमुुळे मुखेड आगारास ९० लाखांच्या जवळपास फटका बसला आहे. आगाराचे उत्पन्न घटल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे़
आगारात ५७ गाड्या
मुखेड आगारात सध्या ५७ गाड्या, १३९ चालक, १३९ वाहक, यांत्रिकी ५०, प्रशासकीय २३ अधिकारी असून आगारातून ५७ गाड्यांच्या १७५ जाणे व १७५ येणे अशा ३५० फेऱ्या एका दिवसात होतात़ तर २३ हजार ४८३ कि.मी. प्रवास होतो. यातून दर किलोमीटरला २९ ते ३१ रुपये उत्पन्न होते. यावरुन दररोज आगारास अंदाजे ७ लाख ५० हजार उत्पन्न मिळते. मुखेड आगारात मागील वर्षी ६६ बस गाड्या होत्या. तर यंदा तर ५७ गाड्या आहेत़ तालुक्यातील १५२ गावांच्या व बाहेरील तालुक्यातील प्रवाशांची एसटीवरच मदार आहे.