नांदेड जिल्ह्यात ९१ हजार दुबार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:45 AM2019-02-28T00:45:07+5:302019-02-28T00:46:46+5:30

निवडणूक विभागाच्या वतीने आगामी निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. मात्र, या यादीत जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात तब्बल ९१ हजार २८८ मतदार दुबार असल्याचा संशय व्यक्त करीत आगामी निवडणुकीत या मतदारांकडून २ ठिकाणी मतदार केले जाण्याची शक्यता प्रदेश काँग्रेसने व्यक्त केली आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली आहे.

9000 thousand Dubara constituencies in Nanded district | नांदेड जिल्ह्यात ९१ हजार दुबार मतदार

नांदेड जिल्ह्यात ९१ हजार दुबार मतदार

Next
ठळक मुद्देदोन ठिकाणी मतदानाची भीतीप्रदेश काँग्रेसने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

नांदेड : निवडणूक विभागाच्या वतीने आगामी निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. मात्र, या यादीत जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात तब्बल ९१ हजार २८८ मतदार दुबार असल्याचा संशय व्यक्त करीत आगामी निवडणुकीत या मतदारांकडून २ ठिकाणी मतदार केले जाण्याची शक्यता प्रदेश काँग्रेसने व्यक्त केली आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली आहे.
निवडणूक विभागाच्या वतीने नांदेड लोकसभेसाठी जिल्ह्यात २५ लाख ३ हजार ६०२ मतदार असून या मतदारांची अंतिम मतदारयादी ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार नांदेड उत्तर मतदारसंघ हा सर्वाधिक मोठा असून या मतदारसंघात ३ लाख ३ हजार १७६ मतदार असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, नव्या मतदारयादीनुसार किनवट मतदारसंघात २ लाख ५७ हजार ६५१ मतदार आहेत. यात १ लाख ३२ हजार ९४५ पुरुष तर १ लाख २४ हजार ५९१ महिला मतदार असतील. हदगाव मतदारसंघात २ लाख ७३ हजार ७०० मतदार असून यात १ लाख ४३ हजार ४७० पुरुष तर १ लाख ३० हजार १०१ महिला मतदार आहेत.
भोकर मतदारसंघात २ लाख ७५ हजार ४६४ मतदार असतील. यात १ लाख ४२ हजार ३२१ पुरुष तर १ लाख ३२ हजार ९४६ महिला मतदारांचा समावेश आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघात २ लाख ७७ हजार ४९६ मतदार असून यात १ लाख ४३ हजार ७८० पुरुष तर १ लाख ३३ हजार ५२४ महिला मतदार आहेत. लोहा विधानसभा मतदारसंघात २ लाख ७० हजार ९२१ मतदार असून १ लाख ४० हजार ९९ पुरुष तर १ लाख ३० हजार ३५ महिला आहेत.
नायगाव मतदारसंघात २ लाख ८० हजार ६४८ मतदार राहणार असून यात १ लाख ४५ हजार ४९१ पुरुष तर १ लाख ३५ हजार २४ महिला मतदार असतील. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघात २ लाख ८८ हजार ४९९ मतदार राहणार असून यात १ लाख ४८ हजार ९०७ पुरुष तर १ लाख ३९ हजार ४४० मतदार राहतील. मुखेड विधानसभा मतदारसंघात २ लाख ७७ हजार ६९ मतदार असतील. यात १ लाख ४५ हजार ३३३ पुरुष तर १ लाख ३१ हजार २२९ महिला मतदार आहेत.
दरम्यान, सोमवारी महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाला निवेदन सादर करण्यात आले. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या म्हणण्यानुसार, किनवट विधानसभा मतदारसंघात १२ हजार २२६, हदगाव मतदारसंघात १३ हजार २१४, भोकर मतदारसंघात ९ हजार ४३६, नांदेड उत्तरमध्ये ६ हजार ८३०, नांदेड दक्षिण ४ हजार ३४६, नायगाव विधानसभा मतदारसंघात १२ हजार ५६६, देगलूर विधानसभा मतदारसंघात ९ हजार ३२३, मुखेड विधानसभा मतदारसंघात १३ हजार ४७ तर लोहा विधानसभा मतदारसंघात १० हजार ३०० अशा जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात ९१ हजार २८८ दुबार मतदारांची नावे मतदारयादीमध्ये समाविष्ट आहेत. हे मतदार एकाचवेळी २ ठिकाणी मतदान करु शकतात, अशी भीती व्यक्त करीत याचा निवडणूक निकालावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाने अंतिम मतदारयादीतील दुबार मतदारांची नावे वगळावीत, अशी मागणी केली आहे. निवडणुका मुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी ही दुबार नावे वगळणे आवश्यक असल्याचे सांगत प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाचे लक्ष या मुद्याकडे वेधले आहे.

Web Title: 9000 thousand Dubara constituencies in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.