९ हजार ५०० शिक्षकांची होणार कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:20 AM2021-01-19T04:20:43+5:302021-01-19T04:20:43+5:30

चौकट- शाळा सुरू करण्यासाठी तयारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांचा आढावा घेऊन ...

9,500 teachers to undergo corona inspection | ९ हजार ५०० शिक्षकांची होणार कोरोना तपासणी

९ हजार ५०० शिक्षकांची होणार कोरोना तपासणी

Next

चौकट- शाळा सुरू करण्यासाठी तयारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांचा आढावा घेऊन तयारी केली. शाळांच्या स्वच्छतेविषयी मार्गदर्शक सूचना सर्व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. शाळांचे निर्जुंतुकीकरण करणे, मास्क वापरणे, स्वच्छतागृहाची साफसफाई, पिण्याचे पाणी, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर आदी विषयांबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

चौकट- शिक्षकांची कोरोना तपासणी

२७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार असल्याने जिल्ह्यातील ९ हजार ५०० शिक्षकांची कोरोना तपासणी करण्याच्या दृृष्टीने नियोजन केले जात आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळांचे ६ हजार ७०८ शिक्षक आहेत. या शिक्षकांची टप्प्याटप्प्याने कोरोना तपासणी केली जाईल. आतापर्यंत ८ हजार ११५ शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.

- प्रशांत दिग्रसकर, जि.प. शिक्षणाधिकारी, नांदेड.

Web Title: 9,500 teachers to undergo corona inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.