वाळूचे ट्रॅक्टर सोडविण्यासाठी तलाठ्यासोबत हुज्जत; मनसे तालुकाप्रमुखावर गुन्हा दाखल

By प्रसाद आर्वीकर | Published: August 22, 2023 11:28 AM2023-08-22T11:28:48+5:302023-08-22T11:28:59+5:30

याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

A case has been filed against the MNS taluka head due to dispute with Talathi over sand tractor release | वाळूचे ट्रॅक्टर सोडविण्यासाठी तलाठ्यासोबत हुज्जत; मनसे तालुकाप्रमुखावर गुन्हा दाखल

वाळूचे ट्रॅक्टर सोडविण्यासाठी तलाठ्यासोबत हुज्जत; मनसे तालुकाप्रमुखावर गुन्हा दाखल

googlenewsNext

- शेख शब्बीर
देगलूर :
शासकीय वाळू अवैधरित्या उपसा करून ती वाहतूक करीत असताना अटकाव करणाऱ्या तलाठ्यासोबत हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी मनसेच्या देगलूर तालुकाप्रमुखासह ट्रॅक्टर चालकावर शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी  देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

२० ऑगस्ट रोजी शहरालगत असलेल्या लेंडी नदी पूल ते बागन टाकळी या रस्त्यावरून शासकीय वाळू अवैधरित्या विना नंबरच्या ट्रॅक्टरमध्ये भरून वाहतूक करीत असताना हनुमान हिप्परगा सज्जाचे तलाठी राजेश गायकवाड यांनी अटकाव केला. तेंव्हा मनसे तालुकाप्रमुख मन्मथ परबत्ते हे घटनास्थळी आले. ट्रॅक्टरची चावी काढून घेऊन माझ्या गाडीस पकडतोस काय? असे म्हणत तलाठ्याशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. तसेच ट्रॅक्टर घेऊन जाण्यास मज्जाव केला. याप्रकरणी तलाठी राजेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मनसे तालुकाप्रमुख मन्मथ परबते व ट्रॅक्टर चालक सचिन कांबळे (रा.उ. सांगवी) या दोघांविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A case has been filed against the MNS taluka head due to dispute with Talathi over sand tractor release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.