मिरवणुकीत धक्का मारल्याचा जाब विचारणाऱ्या प्रशिक्षकाच्या छातीत खुपसला खंजीर
By शिवराज बिचेवार | Updated: April 22, 2023 17:37 IST2023-04-22T17:36:46+5:302023-04-22T17:37:07+5:30
मिरवणुकीत भावाला धक्का मारल्याचा जाब विचारणाऱ्यावर हल्ला

मिरवणुकीत धक्का मारल्याचा जाब विचारणाऱ्या प्रशिक्षकाच्या छातीत खुपसला खंजीर
नांदेड- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत भावाला धक्का मारल्याचा जाब विचारणाऱ्या व्यायाम प्रशिक्षकाच्या छातीत आरोपीने खंजीर खुपसला. ही घटना १४ एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणात वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अक्षय अनिल कापुरे (रा. देगाव चाळ) असे प्रशिक्षकाचे नाव आहे. मिरवणुकीत आरोपी अर्जुन उर्फ बबलू नरवाडे याने त्यांचा भाऊ आदेश कापुरे याला दोन ते तीन वेळेस धक्का मारला. ही बाब आदेशने मोठा भाऊ असलेल्या अक्षयला सांगितली. त्यानंतर अक्षय कापुरे हा जाब विचारण्यासाठी गेला असताना, आरोपी नरवाडे याने त्याच्या छातीत खंजीर खुपसला. त्यामुळे अक्षय कापुरे हा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणाचा तपास पोउपनि. माळी हे करीत आहेत.