मराठवाड्यातील शेतकरी कन्येचा सातासमुद्रापार डंका, बनली अमेरिकेत एअरफोर्स फ्लाइट कमांडर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 04:58 PM2023-01-21T16:58:23+5:302023-01-21T16:59:12+5:30

कोंढा येथील केशवराव बालाजी जोगदंड यांचे पुत्र दिलीप हे २२ वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले.

A farmer's daughter from Marathwada's Satasamudar Danka, became an Air Force flight commander in the US | मराठवाड्यातील शेतकरी कन्येचा सातासमुद्रापार डंका, बनली अमेरिकेत एअरफोर्स फ्लाइट कमांडर

मराठवाड्यातील शेतकरी कन्येचा सातासमुद्रापार डंका, बनली अमेरिकेत एअरफोर्स फ्लाइट कमांडर

googlenewsNext

- गोविंद टेकाळे 
अर्धापूर (जि. नांदेड) :
तालुक्यातील कोंढा या गावातील रेवा दिलीप जोगदंड हिने यशाची उत्तुंग भरारी घेत अमेरिकेतील नेव्हल एअरफोर्स फ्लाइट कमांडर या पदाला गवसणी घातली आहे. एका शेतकरी कन्येने सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला असून, विद्यार्थ्यांसाठी तिचे यश आदर्श ठरत आहे.

कोंढा येथील रेवा जोगदंड हिने कर्तबगारीने अमेरिकेत एअरफोर्स फ्लाइट कमांडर या पदाला गवसणी घातली आहे. दोन वर्षांपासून तिने यासाठी अथक परिश्रम घेतले होते. या पदासाठी अमेरिकेत ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २६ जणांची निवड झाली. त्यातून एकमेव रेवा जोगदंडची फ्लाइट कमांडरपदी वर्णी लागली आहे. यामुळे हौसेसाठी काय पण करणारे कोंढा गाव पुन्हा चर्चेत आले आहे. 

वडिलांच्या संशोधनाची प्रेरणा
कोंढा येथील केशवराव बालाजी जोगदंड यांचे पुत्र दिलीप हे २२ वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. तेथे त्यांनी स्ट्रिंग कंट्रोल्ड दोरीवर विमान उडवून दाखविणे यावर संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. रेवा हिने बालपणातच यातून प्रेरणा घेतली. तेव्हापासून तिने पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते सत्यातही उतरले. 

हेलिकॉप्टरमधून वरात राज्यभरात ठरली चर्चेची
अर्धापूर तालुक्यातील कोंढा हे ३०० उंबरठ्याचे गाव असून येथील व्यवसाय हा शेती आहे. शेती व्यवसायातून काही कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सतत नवनवीन प्रयोग केले जातात. दोन वर्षांपूर्वी प्रगतशील शेतकरी राम कदम यांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तिच्या लग्न समारंभात हेलिकॉप्टरमधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. यामुळे कोंढा हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते. आता रेवाने विदेशात जाऊन गावाचे नाव रोशन केले आहे.

अमेरिकेत असतानाही गावकऱ्यांशी नाळ जुळलेली असून, नेहमी ते गावाकडील घडामोडींचा आढावा घेतात. आमचे बंधू दिलीप जोगदंड यांनी मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ म्हणत मुलगी रेवा हिला वैमानिक क्षेत्रात शिक्षण दिले. रेवामुळे सामान्य शेतकरी कुटुंबाचे नाव चर्चिले जात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.  
- बालाजी जोगदंड, कोंढा, ता. अर्धापूर

Web Title: A farmer's daughter from Marathwada's Satasamudar Danka, became an Air Force flight commander in the US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.