Video: नांदेड स्टेशनवर रेल्वेच्या एका बोगीस भीषण आग, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 11:30 AM2023-12-26T11:30:18+5:302023-12-26T11:30:48+5:30
रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने तत्काळ आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.
- सचिन मोहिते
नांदेड : येथील रेल्वेस्थानकावर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या रिकाम्या रेल्वेगाडीच्या एका डब्याला आज सकाळी १० वाजता अचानक भीषण आग लागली. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने तत्काळ आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.
नांदेड स्थानकावर रेल्वेगाड्यांच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. आज सकाळी दुरुस्तीसाठी राखीव असलेल्या प्लॅटफॉर्मवर एक रेल्वे उभी होती. या रेल्वेगाडीच्या एका डब्याला सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. धूर आणि आग निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ गाड्या धुण्याच्या पाइपच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले.
नांदेड: स्टेशनवर दुरुस्तीसाठी उभ्या रेल्वेच्या बोगीस भीषण आग, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला #nanded#railwaypic.twitter.com/hIBevZ3JvJ
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) December 26, 2023
दरम्यान, आग लागलेला डबा हा स्पेअर कोच होता. हा डबा रेल्वेपासून बाजूला करण्यात आला असून कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.