भरधाव ट्रकने समोरील बाईकला उडवले; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 06:48 PM2022-10-12T18:48:29+5:302022-10-12T18:48:44+5:30

- गोविंद टेकाळे अर्धापूर ( नांदेड ) : भरधाव ट्रकने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर ...

A speeding truck blows up the bike in front; One dead, one seriously injured | भरधाव ट्रकने समोरील बाईकला उडवले; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

भरधाव ट्रकने समोरील बाईकला उडवले; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Next

- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड) :
भरधाव ट्रकने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३:३० वाजता पिंपळगाव महादेव पाटीजवळ घडली. सचिन संभाजी पल्लेवाड ( २३ ) असे मृताचे नाव आहे. तर शिवदास बालाजी वाघे ( २८, दोघे ही राहणार तुराटी ता.उमरी ) असे जखमी युवकाचे नाव आहे.  

भोकर ते नांदेड जात असतांना पिंपळगाव म.पाटीजवळ भरधाव वेगातील ट्रकने ( क्र.एम.एच.२६ ए.डी ०७१९ ) समोरील बाईकला जोरदार धडक दिली. यात सचिन पल्लेवाड आणि शिवदास वाघे हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना १०८ चे डॉ.आनंद शिंदे, चालक रणवीर लंगडे यांनी शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून सचिन यास मृत घोषित केले. तर गंभीर जखमी शिवदासवर उपचार सुरु आहेत. मृत सचिन भोकर येथे एका औषधी दुकानावर कामावर होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक बहीण व एक छोटा भाऊ असा परिवार आहे.

ट्रक मोटरसायकल अपघातामुळे राष्ट्रीय मार्गावर बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी पो.नी अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी तय्यब अब्बास, संजय घोरपडे, अविनाश खरबे, कल्याण पांडे, महेंद्र डांगे,संदीप गायकवाड, बालाजी कोकाटे, सुनिल पाचपोळे,राजु धाडवे, मृत्युंजय दूत अजय देशमुख व महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Web Title: A speeding truck blows up the bike in front; One dead, one seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.