पंजाबहून आणलेल्या रिंधाच्या टोळीतील दहशतवादयाला चार दिवसांची कोठडी
By शिवराज बिचेवार | Published: July 27, 2022 07:13 PM2022-07-27T19:13:19+5:302022-07-27T19:13:45+5:30
बब्बर खालसाचा कुख्यात दहशतवादी रिंधा आणि त्याचा साथीदार दिलप्रीत सिंघ या दोघांनी मन्नु याची हत्या केली होती.
नांदेड : पंजाबहुन आणलेल्या दहशतवाद्याला नांदेडच्या न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. भटिंडा कारागृहातून दिलप्रीतसिंघ डहान याला महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतले होते.
नांदेडमध्ये 2006 साली अवतारसिंघ मन्नु या युवकांची हत्या झाली होती. बब्बर खालसाचा कुख्यात दहशतवादी रिंधा आणि त्याचा साथीदार दिलप्रीत सिंघ या दोघांनी मन्नु याची हत्या केली होती. मयत अवतारसिंघ मन्नु हा रिंधाचा नांदेड मधला विरोधक रोशन माळीला मदत करत असल्याचा संशयावरून त्याला संपवले होते.
या प्रकरणाचा तपास नंतर दाहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला याच प्रकरणातील पुढील तपासासाठी डहानू ला एटीसने ताब्यात घेतलं . आज या आरोपीला नांदेडच्या न्यायालयात हजर केले . कुख्यात गुंड रिंधाला अटक करण्यासाठी तसेच शस्त्र जप्त करण्यासाठी कोठडी मागितली असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची कोठडी दिली.