गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 07:22 PM2024-09-17T19:22:15+5:302024-09-17T19:23:24+5:30
कंधार तालुक्यातील घोडज येथील अकरावी वर्गात शिकणारा संदीप आनंदा घोडजकर वय (१६ वर्ष) मंगळवारी दुपारी घोडज गावाजवळ असलेल्या मन्याड नदीवर गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेला होता.
-मारोती चिलपिपरे -
कंधार (नांदेड ): गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या युवकाचा तालुक्यातील घोडज येथील मन्याड नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना १७ रोजी दुपारच्या सुमारास घडली. संदीप आनंदा घोडजकर असे मयत युवकाचे नाव आहे.
कंधार तालुक्यातील घोडज येथील अकरावी वर्गात शिकणारा संदीप आनंदा घोडजकर वय (१६ वर्ष) मंगळवारी दुपारी घोडज गावाजवळ असलेल्या मन्याड नदीवर गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेला होता. सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन मिरवणूक काढून सायंकाळी उशीरा केले जाते. पण काहीजण घरातील लहान गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आजूबाजूच्या अनेक गावातील गणपतीचे विसर्जन येथे केले जाते. हे विसर्जन पाहत असताना नदीच्या पुलावर कोणीही नसताना व पोहता येत असल्यामुळे संदीपनेही पुलावरून नदीपात्रात उडी मारली. पण तो वर आलाच नाही. अनेकांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण सगळी मेहनत व्यर्थ गेली. काही वेळाने मृतदेह आढळून आला.
याबाबत घोडज गावचे पोलीस पाटील भीमराव लाडेकर यांनी कंधार पोलिसांना कळविले असल्याची माहिती दिली. गणेश विसर्जनाच्या दिवशीच घोडजकर परिवारावर दुःखाचा डोगर कोसळला. गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.