आजी-माजी सरपंचावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:43 AM2018-01-05T00:43:43+5:302018-01-05T00:43:47+5:30

अर्धापूर : बनावट कागदपत्रे तयार करून एका विधवा महिलेचे घर हडप करणा-या तालुक्यातील कामठा बु.येथील आजी-माजी सरपंचासह पाच जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वे गुन्हा दाखल करण्यात आला.

 Aaji-A former Sarpanch's crime | आजी-माजी सरपंचावर गुन्हा

आजी-माजी सरपंचावर गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्धापूर : बनावट कागदपत्रे तयार करून एका विधवा महिलेचे घर हडप करणा-या तालुक्यातील कामठा बु.येथील आजी-माजी सरपंचासह पाच जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वे गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील कामठा बु.येथील सरस्वती पंडीतराव दादजवार आपल्या परिवारासह राहतात. कामठा येथे त्यांच्या पतीच्या नावे ग्रामपंचायती मिळकत क्रमांक ३६६ आहे. पंडीतराव दादजवार यांचे १४ डिसेंबर २००४ मध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले व तीन मुली असा परिवार आहे. पतीच्या नावे असलेली ही मालमत्ता आपल्या नावे करून घेण्यासाठी कामठा ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या. त्यांनी आपले नाव परिवर्तनासाठी अर्ज केला. यावेळी त्यांची मालमत्ता पुंडलिक नारायण गाढवे यांनी आपल्या नावे करून घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले. पुंडलीक गाढवे यांनी माझी मालमत्ता कशाच्या आधारे परीवर्तीतकरुन घेतली याचा खुलासा ग्रामपंचायत करु शकली नाही.
यावेळी त्यांनी आपल्या संपत्तीचा वाद पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे येथील वरीष्ठांच्या कानावर टाकला परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. आजी-माजी सरपंचाने त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली या प्रसंगी त्याची बाजु अँड. ए. आर. चाऊस यांनी मांडली . न्यायालयाने या प्रकरणाचा अभ्यास करून अधार्पूर पोलीसांना संबंधितांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
याप्रकरणी सरस्वती दादजवार यांच्या फियार्दीवरून पुंडलिक गाढवे, ग्रामसेवक एस.बी.पत्रे, सरपंच शिवलिंग उर्फ पिंटु स्वामी, लिपीक कुंडलिक कल्याणकर, तत्कालीन सरपंच लताबाई वाहुळकर यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला.

Web Title:  Aaji-A former Sarpanch's crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.