अबब! ६९७ बाधित, तर पाचजणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:49+5:302021-03-20T04:16:49+5:30
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १९०, जिल्हा रुग्णालयात ८४, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत १११, किनवट २४, मुखेड ६५, देगलूर १४, ...
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १९०, जिल्हा रुग्णालयात ८४, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत १११, किनवट २४, मुखेड ६५, देगलूर १४, हदगाव २३, लोहा ८२, कंधार ८, उमरी ४२, महसूल भवन १०१, मनपाअंतर्गत गृहविलगीकरण २ हजार ३१८, ग्रामीण भागातील गृहविलगीकरण ७४८ आणि खासगी रुग्णालयात ३६० जण उपचार घेत आहेत.
२४९ जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात शुक्रवारी २४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १५, एनआरआय व गृहविलगीकरण १७३, माहूर ३, देगलूर १, हिमायतनगर १, जिल्हा रुग्णालय २६, मुखेड ७, धर्माबाद ३ आणि खासगी रुग्णालयातील २० जणांचा समावेश आहे. आतापर्यंत २४ हजार ८१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० आणि जिल्हा रुग्णालयात १५ खाटा रिक्त आहेत. उपचार घेत असलेल्या ४ हजार १७० जणांमध्ये ५१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.