तेलंगणा मॉडेल स्वीकारा, मी महाराष्ट्रात येणार नाही; तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 07:56 AM2023-03-27T07:56:10+5:302023-03-27T07:56:19+5:30
लोहा येथील बैल बाजाराच्या मैदानावर आयोजित सभेत केसीआर बोलत होते.
नांदेड : तुमचे काम तेलंगणात आहे, मग महाराष्ट्रात कशाला? असा प्रश्न मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज, पाणी, मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये, दलित बंधू योजना या तेलंगणा मॉडेलचा स्वीकार करावा. मी महाराष्ट्रात येणार नाही, असे आव्हान तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी दिले. लोहा येथील बैल बाजाराच्या मैदानावर आयोजित सभेत केसीआर बोलत होते.
ते म्हणाले, लोह्यातील सभेला येऊ नये म्हणून गावागावांत पंगती उठविण्यात येत आहेत. त्यासाठी कोंबडे, बकरे कापण्यात आले; परंतु त्यानंतरही मोठ्या संख्येने नागरिक सभेला आले. नुकतेच मला पश्चिम महाराष्ट्राती
शेतकऱ्यांनी आयुष्यभर लढतच राहायचे का?
७५ वर्षांत काँग्रेस आणि भाजपची सर्वाधिक काळ सत्ता होती. नेते आले अन् गेले; परंतु सामान्यांच्या जीवनात काही फरक पडला नाही. देशात पाणी, जमीन, मानव संपत्ती सर्व मुबलक आहे; परंतु त्याचा योग्य वापर होत नाही. शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढतच राहायचे का? असा सवालही त्यांनी केला.