पत्नीची कॅन्सरसोबत झुंज सुरू असताना इकडे शेतात जाणाऱ्या पतीचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:36 IST2024-09-18T13:35:22+5:302024-09-18T13:36:38+5:30
गावातील गणपती विसर्जन करुन सायंकाळी शेतकरी शेताकडे पायी निघाला होता.

पत्नीची कॅन्सरसोबत झुंज सुरू असताना इकडे शेतात जाणाऱ्या पतीचा अपघाती मृत्यू
हदगाव ( नांदेड) : मनाठा येथील एका तरुण शेतकऱ्याचा मंगळवारी सायंकाळी शेतात जाताना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. देवा दत्ता बल्हाळ (३५ रा.मनाठा ता हदगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही धडक इतकी जोरदार होती की युवकाचा मेंदू बाहेर पडला होता.
गावातील गणपती विसर्जन करुन देवा बल्हाळ शेताकडे सायंकाळी पायी जात होता. गोदाम तांड्यासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत देवा गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी ही माहिती मनाठा पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे तपासून डॉक्टरांनी त्यास मृत्यू झाला.
दरम्यान, मृत देवा बल्हाळ याची पत्नी छत्रपती संभाजीनगर येथील कॅन्सर रुग्णालयात मागील सहा महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. मंगळवारीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली तर इकडे देवा बल्हाळ यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, दोन मुले असा परिवार आहे.