मोबाईल ॲपमध्ये होणार अपघाताची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:28+5:302021-07-07T04:22:28+5:30
यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने मोबाईल व वेब ॲप्लिकेशन विकसित केले आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघाताची नोंद करणे, या अपघाताची ...
यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने मोबाईल व वेब ॲप्लिकेशन विकसित केले आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघाताची नोंद करणे, या अपघाताची माहिती संकलित करून त्या माहितीच्या आधारे अपघात कसे कमी करता येतील, याची चिकित्सा करण्यात येणार आहे. आयआरएडी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक भागातील अपघाताचा डेटा एकत्र करणे आणि रस्ते अपघाताच्या आकडेवारीचे विश्लेषण करून रस्ते अपघातांची संख्या कमी करणे तसेच सुरक्षा वाढविण्यासाठी उपाययोजना करणे, हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यात पोलीस विभागातील साडे चारशेहून अधिक अधिकारी व पोलीस अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाण्यांमध्ये अपघाताच्या नोंदी घेण्यास सुरुवात झाली आहे.
चौकट- अपघाताच्या नोंदी घेणे सुरू
जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यात अपघाताच्या नोंदी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या ॲपवर दररोज होणाऱ्या अपघाताच्या नाेंदी घेतल्या जाणार आहेत. घटनास्थळास भेट देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या घटनास्थळाचे चित्रीकरण करून तो अपलोड करावयाचा आहे.