पार्डीच्या अंगणवाडीत चिमुकल्यांनी भरविला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:23 AM2019-03-21T00:23:34+5:302019-03-21T00:23:56+5:30

अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील अंगणवाडीत पोषण आहार पंधरवडा उपक्रम राबविण्यात आला़ हा उपक्रम ८ ते २२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे़ या उपक्रमात अंगणवाडीसेविका, मदतनीस व चिमुकले सहभागी झाले आहेत़ यानिमित्ताने चिमुकल्यांनी अंगणवाडीत बाजार भरविला होता.

Accumulated market with pinch in Purdy's anganwadi | पार्डीच्या अंगणवाडीत चिमुकल्यांनी भरविला बाजार

पार्डीच्या अंगणवाडीत चिमुकल्यांनी भरविला बाजार

Next

पार्डी : अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील अंगणवाडीत पोषण आहार पंधरवडा उपक्रम राबविण्यात आला़ हा उपक्रम ८ ते २२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे़ या उपक्रमात अंगणवाडीसेविका, मदतनीस व चिमुकले सहभागी झाले आहेत़ यानिमित्ताने चिमुकल्यांनी अंगणवाडीत बाजार भरविला होता.
गावात रॅली काढून पोषण आहारविषयी माहिती सांगण्यात आली़ यामध्ये प्रामुख्याने बेटी बचाओ बेटी पढाओ, अंगणवाडीतील आहाराविषयी मुलांच्या आई-वडिलांना माहिती सांगण्यात आली़ तसेच मुलीचे योग्य वयात लग्न करावे, याविषयी माहिती देण्यात आली़ कुपोषित बालकांविषयी व दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराविषयी माहिती सांगण्यात आली़ अंगणवाडीच्या वतीने ‘हात धुणे’ उपक्रम राबविण्यात आला आहे़ तसेच गावातील शेतकऱ्यांना भाग्यश्री योजनेविषयी माहिती देण्यात आली़
२० मार्च रोजी अंगणवाडीतील चिमुकल्यांनी शेतीतील भाजीपाला आणून बाजार भरविला. यामध्ये प्रामुख्याने हिरवी मिरची, टमाटे, कोथिंबीर, पालक भाजी, वांगी, गाजर, काकडी, लसूण, बटाटे इत्यादी भाजीपाला विक्रीसाठी मुलांनी आणला होता़ भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती़
यावेळी माजी सरपंच मारोतराव देशमुख, उपसरपंच शेख मौला साहब, पुजाराम मदने, शेख गुलाब, भास्कर तरोडकरसह अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर उपस्थित होते़
यामध्ये मंदा नरोटे, सरस्वती पारदे, स्वाती खरटमोल, स्वाती कांबळे, रोमा मदिने, सयाबाई हुपाडे, नमिता जोगदंड, रेखा सूर्यवंशी, लता दाढेल, सरस्वती खंडागळे, धुरपता वाघमारे, एल. एस. वाखरडे, रब्बानी नदाफ, गुणाबाई कांबळे, अनिता चव्हाणसह गावकरी उपस्थित उपस्थित होते़

Web Title: Accumulated market with pinch in Purdy's anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.