क्रेडीट सोसायटीच्या बोगस शाखा काढून गंडा घालणारे आरोपी तीन महिन्यापासून मोकाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 07:09 PM2018-11-02T19:09:13+5:302018-11-02T19:11:41+5:30

पिडीतानांच पोलिसांकडून सबुरीचे सल्ले मिळत असल्याने लोकांत पोलिस प्रशासनाच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त होत आहे़

accused free from bogus credit society case in nanded | क्रेडीट सोसायटीच्या बोगस शाखा काढून गंडा घालणारे आरोपी तीन महिन्यापासून मोकाट 

क्रेडीट सोसायटीच्या बोगस शाखा काढून गंडा घालणारे आरोपी तीन महिन्यापासून मोकाट 

Next

नांदेड : बा-हाळी येथे महाराष्ट्र अर्बन को़ क्रेडीट सोसायटी या नावाने बोगस शाखा काढून शेतकरी, व्यापारी व कर्मचारी भरतीच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या पाच आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद होवून तब्बल तीन महिने लोटले तरी अद्याप मोकाटच असून पिडीतानांच पोलिसांकडून सबुरीचे सल्ले मिळत असल्याने लोकांत पोलिस प्रशासनाच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त होत आहे़

बा-हाळीत १६ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र अर्बन कोक़्रेडीट सोसायटीच्या नावाने बोगस शाखा सुरुवात करण्यात आली़ यात स्वयंघोषित बँक संचालक सुनील दिंडे, विभागीय व्यवस्थापक संदीप वाघमारे, कोअर कमिटी सदस्य मुबारक भांडे, लक्ष्मण गायकवाड, बा-हाळी शाखा व्यवस्थापक विजय राठोड यांचा मुख्य सहभाग होता़ या पाच जणांनी मिळून जवळपास १७ लोकांना कर्मचारी म्हणून नेमणूक केली़ यात त्यांच्याकडून लाखो रुपये गोळा केले़ त्यानंतर या कर्मचाऱ्यामार्फत एका महिन्यात ११६ बचत खाती, ८० पिग्मी खाती, १५ चालू खाती उघडण्यात आली व त्या माध्यमातून बा-हाळीतील शेतकरी, व्यापारी, कर्मचारी यांच्याकडल लाखो रुपयांवर डल्ला मारला.

या कारवाईनंतर पोलिसांनी पिडीत लोकांना त्वरित आरोपींना अटक करण्याचे आश्वासन देवून शांत केले होते़ पण तब्बल तीन महिने लोटले तरी पोलिसांना आरोपी सापडतच नाहीत़ विशेष म्हणजे उदगीर व बा-हाळी परिसरात पिडीत लोकांना वरील पाचही आरोपी तक्रार मागे घेण्यासाठी अनेकदा संपर्क करीत आहेत़ हे पोलिसांना माहीत असतानाही जाणीवपूर्वक कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही़ विचारणा करण्यासाठी गेलेल्या पिडीत व्यक्तीलाच पोलिस सबुरीचा सल्लार देत असल्याने पोलिस प्रशासनाच्या भूमिकेविषयीच शंका येत आहे़

१७ लोकांना दिली होती नोकरी
बा-हाळीत १६ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र अर्बन कोक़्रेडीट सोसायटीच्या नावाने बोगस शाखा सुरु केली़ यामध्ये  बँक संचालक सुनील दिंडे, विभागीय व्यवस्थापक संदीप वाघमारे, कोअर कमिटी सदस्य मुबारक भांडे, लक्ष्मण गायकवाड, शाखा व्यवस्थापक विजय राठोड  यांनी १७ लोकांना कर्मचारी म्हणून नेमणूक केली़  या कर्मचाऱ्यामार्फत एका महिन्यात ११६ बचत खाती, ८० पिग्मी खाती, १५ चालू खाती उघडण्यात आली व त्या माध्यमातून बाºहाळीतील शेतकरी, व्यापारी, कर्मचारी यांच्याकडल लाखो रुपयांवर डल्ला मारला़ त्यावेळी पोलिसांनी पिडीत लोकांना आरोपींना त्वरीत अटक करण्याचे आश्वासन दिले होते़ 

- आरोपींचा शोध चालू आहे़ लवकरच पकडण्यात येईल़ त्या अगोदर आम्ही पुरावे गोळा करीत आहोत़ - सुनील नाईक, सपोनि, मुक्रमाबाद़

- उदगीर व परिसरात राजरोसपणे फिरणारे आरोपी पोलिसांना भेटत नाहीत़ आमचे जवाब घेण्याच्या नावाखाली आरोपींना सुट देण्याचे काम पोलिसांकडून होत आहे - रोहीत लक्ष्मण पवार (तक्रारदार)

Web Title: accused free from bogus credit society case in nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.